शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्या होणार हायटेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 22:41 IST

अंगणवाडीची माहिती आॅनलाईन सादर करण्यासाठी शासनाकडून प्रत्येक अंगणवाडीला स्मार्ट फोन उपलब्ध करून दिला जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण २३७८ अंगणवाड्या आहेत. या सर्व अंगणवाड्यांना लवकरच स्मार्ट फोन दिला जाणार आहे.

ठळक मुद्देप्रत्येक नोंद होणार आॅनलाईन : २३७८ अंगणवाड्यांना मिळणार स्मार्ट फोन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अंगणवाडीची माहिती आॅनलाईन सादर करण्यासाठी शासनाकडून प्रत्येक अंगणवाडीला स्मार्ट फोन उपलब्ध करून दिला जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण २३७८ अंगणवाड्या आहेत. या सर्व अंगणवाड्यांना लवकरच स्मार्ट फोन दिला जाणार आहे.प्रशासनाच्या कारभाराला गती देण्यासाठी शासन आॅनलाईन माहितीवर विशेष भर दिले जात आहे. मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यापासून त्यांचे आरोग्य व पोषण आहार उपलब्ध करून देण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी अंगणवाडीकडून पार पाडली जाते. विविध विभागामार्फत अंगणवाडी सेविकेला माहिती मागितली जाते. या सर्व माहितीची रजिस्टरवर नोंद केली जाते. अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या बराचसा वेळ माहिती भरण्यामध्येच जात होता. अंगणवाडी कर्मचारी सततच्या माहितीमुळे त्रस्त झाले होते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा वेळ वाचून त्यांना बालकांच्या शिक्षण व आरोग्याकडे लक्ष देता यावे, यासाठी शासनाने प्रत्येक अंगणवाडीला स्मार्ट फोन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.गडचिरोली जिल्ह्यात १ हजार ७७१ अंगणवाड्या, ५१८ मिनी अंगणवाड्या, ८९ नागरी भागातील अंगणवाड्या अशा एकूण २ हजार ३७८ अंगणवाड्या आहेत. या सर्व अंगणवाड्यांना स्मार्ट फोन उपलब्ध करून दिला जाणार आहे. माहिती भरण्यासाठी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाने स्वतंत्र अ‍ॅप तयार केला आहे.लसीकरण, गृहभेट याबाबतचा दरदिवशीचा रिपोर्ट व इतर माहिती भरता येणार आहे. वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार आहे. मोबाईलचा खर्च म्हणून प्रत्येकी तीन महिन्याला ४०० रूपये दिले जाणार आहेत.सततची माहिती भरण्यामुळे अंगणवाडी कर्मचारी आजपर्यंत त्रस्त होत्या. अ‍ॅप उपलब्ध झाल्याने माहिती भरण्याच्या त्रासापासून त्यांची मुक्तता होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्मार्ट फोन उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने एक महिन्यापूर्वी घेतला आहे. प्रत्येक जिल्हास्तरावरून किती मागणी आहे. याची माहिती मागविण्यात आली होती. मात्र अजुनपर्यंत स्मार्ट फोन उपलब्ध झाले नाही.इंटरनेटच्या गंभीर समस्येचे काय?गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास ३० टक्के भागातच इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे. त्यातही बहुतांश ठिकाणी टू-जी सेवा असल्याने इंटरनेट व्यवस्थित काम करीत नाही. स्मार्टफोनसाठी इंटरनेटची स्पीड अधिक असणे आवश्यक आहे. शिक्षण, रोहयो व इतर विभागांनी आॅनलाईन माहिती सादर करण्यासाठी स्वतंत्र अ‍ॅप तयार केले. मात्र दुर्गम भागात इंटरनेट काम करीत नसल्याने ते कर्मचारी कमालीचे त्रस्त आहेत. हाच कटूअनुभव अंगणवाडी कर्मचाºयांनाही येण्याची शक्यता नाकारता येत नाही.