शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलविरोधी लढ्यासाठी ‘शौर्य स्थळ’ प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 05:00 IST

जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियान राबवताना आतापर्यंत २१२ जवानांनी बलीदान दिले. त्या जवानांचे शौर्य व पराक्रम, त्यांनी केलेला त्याग कायम स्मरणात राहावा आणि त्यांच्या आठवणी गडचिरोली पोलीस दलातील जवानांना प्रेरणा देत राहाव्या यासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून ‘शौर्य स्थळ’ या वास्तुची उभारणी करण्यात आली.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षक बलकवडे : जिल्हा पोलीस दलाची शौर्यगाथा सांगणाऱ्या इमारतीचे शहीद कुटुंबीयांच्या हस्ते उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलविरोधी अभियानात आतापर्यंत शहीद झालेल्या आणि विशेष कामगिरी करत विविध पदके पटकावणाऱ्या पोलीस दलाची शौर्यगाथा सांगणारे ‘शौर्य स्थळ’ नक्षलविरोधी लढ्यासाठी सर्वांना प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी व्यक्त केला. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात उभारलेल्या या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.शहीद कुटुंबियांच्या हस्ते रविवारी या शौर्य स्थळाचे उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी विद्यार्थी आणि नागरिकांनी आवर्जुन भेट द्यावी असे आवाहनही याप्रसंगी पो.अधीक्षक बलकवडे यांनी केले.जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियान राबवताना आतापर्यंत २१२ जवानांनी बलीदान दिले. त्या जवानांचे शौर्य व पराक्रम, त्यांनी केलेला त्याग कायम स्मरणात राहावा आणि त्यांच्या आठवणी गडचिरोली पोलीस दलातील जवानांना प्रेरणा देत राहाव्या यासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून ‘शौर्य स्थळ’ या वास्तुची उभारणी करण्यात आली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक डॉ.मोहीतकुमार गर्ग, अपर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, सहायक पोलीस अधीक्षक मुमक्का सूदर्शन यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच शहीद जवानांचे कुटुंबिय उपस्थित होते.असे आहे हे ‘शौर्य स्थळ’शौर्य स्थळ या वास्तूमध्ये नक्षलविरोधी लढ्यात शहीद झालेल्या जवानांच्या शौर्याचे व अप्रतिम कामगिरीचे लेखन करण्यात आले असून शहीद जवानांच्या गाथा सांगणाऱ्या चित्रफितीही तयार करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ज्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रपती पदक, राष्ट्रपती शौर्य पदक प्राप्त झाले आहे त्यांच्या नावांचा उल्लेखही या ठिकाणी करण्यात आला आहे. गडचिरोली पोलीस दलाने जिल्ह्यातील आदिवासी बांधवांसह प्रत्येक घटकासाठी राबविलेल्या नाविन्यपूर्ण योजनांनाही शौर्य स्थळामध्ये स्थान देण्यात आले आहे.पोलीस रुग्णालयाचे नुतनीकरणपोलीस दलाकरिता असलेल्या रुग्णालयाचे नुतनीकरण आणि बहुउद्देशिय चिकित्सा केंद्राचा उदघाटन सोहळा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते रविवारी पार पडला. या रुग्णालयात रुग्णासाठी विविध सोयी सुविधा एकाच ठिकाणी प्राप्त होण्यासाठी आणि नक्षलविरोधी अभियान राबवणाऱ्या जवानांना तत्काळ उपचार मिळावेत यासाठी अत्याधुनिक मशिनरीसह तज्ज्ञ डॉक्टरांची चमू सदैव सेवेत राहणार आहे. त्याचा फायदा जिल्हाभरातील पोलीस अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांना होणार आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीPoliceपोलिस