शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सासू व नातेवाईकांकडून सुनेला जबर मारहाण, पती फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:49 IST

स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत प्रियदर्शनी गावातील विवाहित महिलेस सासू, जाऊ, पतीचा मेहुणा व त्याच्या पत्नीने जबर मारहाण करून .....

ठळक मुद्देचौघांना अटक : पीडित महिला आष्टीच्या रूग्णालयात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत प्रियदर्शनी गावातील विवाहित महिलेस सासू, जाऊ, पतीचा मेहुणा व त्याच्या पत्नीने जबर मारहाण करून अंगावर ठिकठिकाणी चावा घेतल्याने विवाहित महिलेला गंभीर अवस्थेत असताना येथील पोलीस पाटील सदाशिव नैताम व काही नागरिकांनी आष्टीच्या ग्रामीण रूग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. तक्रारीवरून आष्टी पोलिसांनी सासूसह चौघांना अटक केली असून पती फरार आहे.मनिषा संतोष कुळमेथे (२५) रा. प्रियदर्शनी असे गंभीर जखमी पीडित विवाहित महिलेचे नाव आहे. मनिषाचे लग्न संतोष सन्याशी कुळमेथे याचेशी २०१३ मध्ये झाले. त्यानंतर त्यांना एक मुलगी झाली. दरम्यान सासू कमलाबाई हिच्या सांगण्यावरून सून मनिषा हिला पती संतोष हा मारझोड करू लागला. त्यावेळी मनिषाने चामोर्शीच्या महिला तक्रार निवारण मंचाकडे २०१५ मध्ये तक्रार दाखल केली. येथे दोघांनाही बोलावून त्यांच्यात समझोता करून देण्यात आला. त्यानंतर पती-पत्नी दोघेही एकत्र राहू लागले. संतोषच्या आईच्या सांगण्यावरून पती-पत्नी नेहमी भांडण व मारहाणीचे प्रकरण घडत होते. त्यामुळे पीडित मनिषा आपल्या पतीसोबत स्वतंत्र राहत होती. दोन महिन्यांपूर्वी पती संतोष कुळमेथे घरातून निघून गेला. मनिषाने आष्टी पोलीस ठाणे गाठून पती फरार झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर महिला तक्रार निवारण मंच गडचिरोली येथे सुध्दा तक्रार दिली. मंचाच्या वतीने ज्यांच्या विरोधात तक्रार आहे, त्यांच्या विरोधात नोटीस बजाविण्यात आली. सदर नोटीस पाहताच शनिवारी सायंकाळी मनिषाची सासू, जाऊ, पतीचा मेहुणा व त्याची पत्नी या सर्वांशी मनिषाशी भांडण करून मनिषास जबर मारहाण केली. पतीचा मेहुणा निलकंठ कन्नाके याने चावा घेतला. मनिषा बेशुध्द झाल्यावर हे सारेजण तेथून निघून गेले. त्यानंतर गावातील पोलीस पाटील सदाशिव नैताम व काही नागरिकांनी मनिषाला ग्रामीण रूग्णालय आष्टी येथे उपचारासाठी दाखल केले व पोलिसांत तक्रार दिली.आरोपींमध्ये सासू कमलाबाई सन्याशी कुळमेथे, निलकंठ कन्नाके, वंदना कन्नाके, सुनंदा साईनाथ कुळमेथे यांचा समावेश आहे. या सर्वांनी मनिषा गावात कशी राहते, असे म्हणत तिला जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून तसेच पीडित मनिषा हिच्या बयानावरून या सर्व आरोपीविरोधात आष्टी पोलिसांनी गुन्हा नोंद दाखल केला. चारही आरोपींना ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक दीपक लुकडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.मनिषाला मारहाण करणाºया सदर आरोपींना शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने पोलीस पाटील नैताम, माजी जि.प. सदस्य राजू यांनी केली आहे.