शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
3
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
4
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
5
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
6
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
7
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
8
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
9
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
10
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
11
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
12
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
13
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
14
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
15
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
16
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
18
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
19
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
20
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या

नुकसानग्रस्तांना मदत देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 22:57 IST

यावषी पूर्व विदर्भातील धानाच्या जिल्ह्यात पावसाच्या कमतरतेमुळे मावा-तुडतुड्याचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणात शेतकºयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देभाजप प्रवक्त्यांची ग्वाही : किडीवर मात करण्यासाठी शत्रूकिडीची उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावषी पूर्व विदर्भातील धानाच्या जिल्ह्यात पावसाच्या कमतरतेमुळे मावा-तुडतुड्याचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणात शेतकºयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे सर्व्हेक्षण सुरू असून शेतकºयांना मदत देण्यासंदर्भात सरकार गांभीर्याने विचार करीत आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सरकारची कामगिरी सांगण्यासाठी भंडारी पूर्व विदर्भाच्या दौºयावर निघाले आहेत. त्यात सोमवारी सायंकाळी त्यांनी गडचिरोलीत पत्रकारांना माहिती दिली.अनियमित आणि कमी पावसामुळे किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कीटकनाशकाची फवारणी हा ठाम उपाय आता राहिलेला नाही. त्याऐवजी इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित प्रतिकीटकांचा वापर योग्य ठरणार आहे. प्रत्येक किडीला शत्रुकिड असते. त्यामुळे ती किडच उपद्रवी किडीला नष्ट करू शकते. त्यासाठी शास्त्रज्ञांकडून योग्य ती माहिती घेतली जात असून भारतातही हे तंत्रज्ञान विकसित करून किडीच्या प्रादुर्भावर उपायोजना तयार करणे सुरू असल्याचे भंडारी यांनी सांगितले. शेतीच्या क्षेत्रात मुलभूत बदल केल्याने शेतीत गुंतवणूक वाढली. जलयुक्त शिवार, शेततळे यामुळे शेतीच्या पाण्याचे विकेंद्रीकरण झालं. विहिरींच्या पाण्यावरील सिंचन क्षेत्र वाढलं. शेतकºयांना ३४ हजार २२ कोटी रुपयांची कर्जमाफी देताना शेतकºयांना कर्जमुक्त करून त्यांची पत वाढविणे, जेणेकरून त्यांना पुढील कर्ज उपलब्ध होण्यासाठी अडचण जाणार नाही, अशी व्यवस्था केली. आधीच्या आणि आताच्या कर्जमाफीत हा मुख्य फरक असल्याचे त्यांनी सांगितले.या कर्जमाफीसाठी निकषात बसत असलेल्या परंतू विविध कारणांनी वंचित राहिलेल्या शेतकºयांचा फेरआढावा घेण्यासाठी तालुकास्तरावर सहायक निबंधकांच्या नेतृत्वात समित्यांचे गठन करून छाननी केली जाणार असल्याचे यावेळी भंडारी यांनी सांगितले.या पत्रपरिषदेला खा.अशोक नेते, जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, माजी जि.प.अध्यक्ष रवींद्र ओलालवार, विदर्भ विभाग प्रसिद्धी प्रमुख चंदन गोस्वामी, रमेश भुसारी, डॉ.भारत खटी, अनिल कुनघाडकर, आनंद श्रृंगारपवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.गडचिरोलीसाठीच्या जीआरची अंमलबजावणी करणारयावेळी माधव भंडारी यांनी राज्य सरकारच्या विविध कामगिरीची माहिती सांगितली. परंतू गडचिरोली जिल्ह्यात अधिकाºयांच्या रिक्त पदांमुळे परिस्थिती विपरित आहे, ही बाब पत्रकारांनी निदर्शनास आणून दिली. त्यावर खा.नेते यांनी गडचिरोली जिल्ह्यात काम करणाºया अधिकाºयांसाठी शासनाने काढलेल्या स्वतंत्र जीआरची आठवण करून दिली. त्या जीआरनुसार गडचिरोलीत दोन वर्षे काम करणाºया अधिकाºयांना नंतर इच्छित ठिकाणी बदली देण्याचे प्रयोजन आहे. परंतू त्या जीआरची अंमलबजावणीच होत नसून ती राज्य शासनाने गांभिर्याने करावी अशी सूचना खा.नेते यांनी केली. त्यावर ही बाब मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवून त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे भंडारी यांनी सांगितले.३३ टक्के नुकसानीसाठीही मदतयावेळी खासदार अशोक नेते यांनी संपूर्ण गडचिरोली लोकसभा क्षेत्रातील शेतकºयांची परिस्थिती यावर्षी किडीमुळे विदारक असल्याचे सांगून ७० टक्के शेतकºयांचे पीक वाया गेल्याचे सांगितले. त्यामुळे हे क्षेत्र दुष्काळग्रस्त घोषित करावे अशी मागणी सरकारकडे केली आहे. नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी सर्व्हेक्षण सुरू आहे. त्यामुळे शेतकºयांना भरपाई मिळणार असून केवळ ५० टक्केपेक्षा जास्त नाही तर ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान असणाºया शेतकºयांनाही मदत मिळेल, असे खा.नेते म्हणाले.