शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

झिंगानूर भागात भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: June 1, 2017 01:58 IST

सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर भागातील अनेक गावांमधील विहिरी कोरड्या पडल्या असून हातपंपाच्या पाण्याची पातळी खालावली आहे.

विहिरी कोरड्या : बैलबंडीद्वारे ड्रमातून आणावे लागत आहे दूरवरून पाणी लोकमत न्यूज नेटवर्क झिंगानूर : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर भागातील अनेक गावांमधील विहिरी कोरड्या पडल्या असून हातपंपाच्या पाण्याची पातळी खालावली आहे. परिणामी झिंगानूर चेक नं. १ व झिंगानूर चेक नं. २ या गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे अनेक नागरिकांना बैलबंडीद्वारे ड्रमातून लांब अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. सिरोंचा तालुक्यात गेल्या १५-२० दिवसांपासून प्रचंड उष्णतामान होते. कडक उन्हामुळे या भागातील पाणी स्त्रोताची पाण्याची पातळी प्रचंड खालावली. मे महिन्या सुरुवातीलाच या भागातील तलाव, बोड्या, नाले व विहिरी पूर्णत: कोरड्या झाल्या. विशेष म्हणजे सिरोंचा तालुक्याच्या झिंगानूर भागात पाण्याची पातळी खालावल्यामुळे नव्याने खोदण्यात येत असलेल्या हातपंपांना तसेच विहिरींना कमी अंतरावर पाणीही लागत नाही. या भागात खडक असल्याने अनेक नवीन विहिरींचे बांधकामही रखडले आहे. झिंगानूर येथे नळ पाणीपुरवठा योजना नाही. तसेच पाण्याची टाकी नाही. त्यामुळे या भागात पाणीटंचाईची समस्या तीव्र झाली आहे. पाणीटंचाईमुळे पावसाळ्याच्या तोंडावर या भागातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. महिलांची सकाळपासूनच पाण्यासाठी भटकंती सुरू होत असते. प्रशासनाचे दुर्लक्ष सिरोंचा तालुक्याच्या झिंगानूर भागात भीषण पाणीटंचाई असतानासुद्धा प्रशासनाचे एकही अधिकारी तसेच अनेक लोकप्रतिनिधींनी भेट देऊन पाहणी केली नाही. झिंगानूर भागातील मूलभूत समस्यांकडे शासन, लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.