शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या दक्षिण भागाला वादळी पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 05:00 IST

गेल्या दाेन दिवसांपासून वातावरण काहीसे ढगाळ आहे. बुधवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आणि काही वेळातच मेघगर्जनेसह १५ ते २०  मिनिटे, तर काही ठिकाणी अर्धा तास पावसाने हजेरी लावली. चामोर्शी, अहेरी, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा या तालुक्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला. गडचिराेली शहरासह तालुक्यातील अनेक गावांत वादळासह हलकासा पाऊस झाला.

ठळक मुद्देअनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित : वातावरणात अचानक बदल

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : भर एप्रिल महिन्याच्या उन्हात बुधवारी (दि.२१) अवकाळी पावसाने दक्षिण भागातील अर्ध्या तालुक्यामध्ये धुमाकूळ घातला. जोरदार वादळ आणि विजांच्या थयथयाटासह आलेल्या या पावसाने अनेक घरांवरील टिनाचे छत हवेत उडवले. त्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे काही भागांत झाडांचीही पडझड झाली. यादरम्यान अनेक भागांत रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. चामाेर्शी शहरासह तालुक्यात जाेरदार वादळीवाऱ्यासह पाऊस बरसला. तालुक्यातील नागपूर चक या गावात वादळी पावसामुळे घरांची पडझड झाली. टिनपत्रे व कवेलू उडून पडाली आहेत. अनेक घरमालकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये संताेष रायसिडाम, रवी मडावी, जीवन भाेयर, सुखदेव भाेयर, रत्नाकर भाेयर आदींचा समावेश आहे. संताेष रायसिडाम यांचे सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती आहे. भामरागड येथेही वादळी पाऊस बरसला. काही घरांवरील  टिनपत्रे व कवेलू उडून खाली पडली. एटापल्ली शहरासह तालुक्यात वादळी पाऊस बरसला. काही वेळ विजेचा जाेरदार कडकडाट हाेता. धानाेरा येथे विजेचा कडकडाट हाेता; पण पाऊस बरसला नाही. अहेरी तालुक्यातही पाऊस बरसला नसल्याची माहिती आहे.गेल्या दाेन दिवसांपासून वातावरण काहीसे ढगाळ आहे. बुधवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आणि काही वेळातच मेघगर्जनेसह १५ ते २०  मिनिटे, तर काही ठिकाणी अर्धा तास पावसाने हजेरी लावली. चामोर्शी, अहेरी, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा या तालुक्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला. गडचिराेली शहरासह तालुक्यातील अनेक गावांत वादळासह हलकासा पाऊस झाला. त्यामुळे काही गावांतील वीजपुरवठा खंडित झाला हाेता. वातावरणातील या बदलामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. भामरागड येथेही वादळी पाऊस बरसला. काही घरांवरील  टिनपत्रे व कवेलू उडून खाली पडली. एटापल्ली शहरासह तालुक्यात वादळासह विजेचा जाेरदार कडकडाट हाेता. धानाेरा येथेही वादळी पाऊस बरसला.  

अनेक घरांवरील टिन, कवेलू उडालेचामाेर्शी शहरासह तालुक्यात जाेरदार वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. नागपूर चक या गावात वादळाने घरांची पडझड झाली. टिनपत्रे व कवेलू उडून पडली. अनेक घरमालकांचे नुकसान झाले. यामध्ये संताेष रायसिडाम, रवी मडावी, जीवन भाेयर, सुखदेव भाेयर, रत्नाकर भाेयर आदींचा समावेश आहे. रायसिडाम यांचे सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती आहे.

अनेक गावे रात्रभर अंधारातमेघगर्जनेसह वादळी पाऊस हाेताना विजेचा कडकडाट जाेरात हाेता. यामुळे अनेक गावातील वीज पुरवठा खंडित झाला. सध्या संचारबंदी व काेराेनाची परिस्थिती असल्याने रात्रीच्या वेळीस वीज वितरण कंपनीचे कर्मचारी गावात पाेहाेचले नाही. परिणामी अनेक गावे रात्री अंधारात हाेती. एटापल्ली, भामरागड तालुक्यात वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. दुर्गम भागातील गावांमधील खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी दाेन ते तीन दिवस लागतात, हा ग्रामस्थांचा अनुभव आहे.

 

टॅग्स :Rainपाऊस