शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By admin | Updated: July 14, 2014 23:58 IST

विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद व राज्य सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले. या आंदोलनाला इतरही कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दर्शविला.

इतर संघटनांचा पाठिंबा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिले धरणेगडचिरोली : विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद व राज्य सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन केले. या आंदोलनाला इतरही कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दर्शविला. केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन एलएचव्हीची पदे मंजूर करण्यात यावी. आरोग्य सहाय्यक पदाचे ग्रेड वेतन २ हजार ८०० रूपये करण्यात यावे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदनाम बदलाचे आदेश निर्गमित करावे, आरोग्य सेवकांची शैक्षणिक पात्रता बारावी व प्रशिक्षणाचा कालावधी २ वर्षाचा करावा, एनआरएचएमचे काम देण्यात येऊ नये, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बाह्यरूग्ण व आंतररूग्ण विभागासाठी स्वतंत्र पदे भरावी, अर्धवेळ स्त्री परिचारांना किमान १० हजार रूपये वेतन द्यावेत व ग्रा.प. कर्मचाऱ्यांप्रमाणे वर्ग ४ च्या पदावर सामावून घ्यावे, आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्ह्यात स्त्री कर्मचाऱ्यांना लागू असलेला हार्डशीप अलाऊन्स पुरूष कर्मचाऱ्यांनाही लागू करावा, हिवताप विभागात निवड समितीने घेतलेल्या १६९ आरोग्य सेवेकांची सेवा नियमित करावी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांना भविष्यात पदोन्नतीची संधी उपलब्ध नाही. अशा पदवीधारक प्रयोगशाळा तंत्रज्ञांना कालबध्द वेतनश्रेणी लागू करावी आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला अनेक संघटनांनी पाठिंबा दिला. आंदोलनात शेकडो आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. धरणे आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. १६ जुलै रोजी मुंबई येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यानंतरही मागण्या सोडविण्यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास २१ जुलैपासून संपूर्ण कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र खरवडे, कार्याध्यक्ष आशांद सहारे यांनी केले. यावेळी कोटरंगे, सचिव विनोद सोनकुसरे, कोषाध्यक्ष अनिल मंगर, उपाध्यक्ष टी. डी. आंबोणे, जी. वाय. पाल, आनंद मोडक, महेंद्र हुलके, प्रसिध्दी प्रमुख मोहन भुरसे, पी. डी. कोठारे, सी. एच. लडके, प्रविण गेडाम, शेख फुलझेले, नर्सेस संघटनेच्या प्रभारी अध्यक्ष कल्पना साखरे, कार्याध्यक्ष डी. टी. भुरे, सचिव विमल अंबाडकर आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)