शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्राच्या जागेचा तिढा सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 22:30 IST

रंगय्यापल्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्रस्तावित असलेल्या जागेवर दोन शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले होते. त्यामुळे बांधकामाला अडथळा निर्माण झाला होता. जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार व बालकल्याण सभापती जयसुधा जनगाम यांनी शेतकऱ्यांची समजूत घालून जागा देण्यास राजी केले.

ठळक मुद्देअतिक्रमण काढले : जिल्हा परिषद उपाध्यक्ष व सभापतींनी केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : रंगय्यापल्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्रस्तावित असलेल्या जागेवर दोन शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले होते. त्यामुळे बांधकामाला अडथळा निर्माण झाला होता. जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार व बालकल्याण सभापती जयसुधा जनगाम यांनी शेतकऱ्यांची समजूत घालून जागा देण्यास राजी केले. त्यामुळे या आरोग्य केंद्राच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.रंगय्यापल्ली हे मोठे गाव आहे. या गावाच्या सभोवताल अनेक लहान-मोठी गावे आहेत. या गावातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या या उद्देशाने तत्कालीन आ. दीपक आत्राम यांनी नवीन आरोग्य केंद्रासाठी शासनाकडे पाठपुरावा करून निधी खेचून आणला. आरोग्य विभागामार्फत ओपीडी सुरू करायला लावले. आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी वन विभागाने २ हेक्टर जागा दिली आहे. शेतकºयांनी या जागेवर अधिकार सोडल्यानंतर आता सदर जागा आरोग्य केंद्राच्या मालकीची झाली आहे. कंकडालवार व जयसुधा जनगाम यांच्या मध्यस्थीनंतर शेतकºयांनी स्वत:हून अतिक्रमण काढले.आरोग्य केंद्राच्या जागेची पाहणी करतेवेळी गडचिरोलीचे जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनील मडावी, डॉ. मनोहर कन्नाके, डॉ. गणेश लाडस्कर, सरपंच सत्यमा कोरेत, आविसं तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम, माजी उपसरपंच रवी सल्लम, प्रसाद मद्दीवार, कृउबासचे संचालक आकुला मल्लीकार्जुनराव, पेंटिपाकाचे उपसरपंच कुमरी सडवली, तिरूपती कम्मम, आतकुरी समय्या, बानय्या दुर्गम यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी शासनाने ६ कोटींचा निधी मंजूर केला आहे.