शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:03 IST

नक्षलग्रस्त आदिवासी बहूल धानोरा तालुका मुख्यालयापासून २४ किमी अंतरावर असलेल्या मुरूमगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.

ठळक मुद्देमुरूमगावातील वास्तव : प्रसुतीकक्षाचे छत जीर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : नक्षलग्रस्त आदिवासी बहूल धानोरा तालुका मुख्यालयापासून २४ किमी अंतरावर असलेल्या मुरूमगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र या आरोग्य केंद्राच्या इमारतीची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. परिणामी येथे येणाºया रूग्णांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींसह आरोग्य यंत्रणेचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे.मुरूमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया गृह आहे. मात्र या आॅपरेशन थिएटरमध्ये पावसाळ्यात पाणी गळती लागत असते. परिणामी अशा ठिकाणी शस्त्रक्रिया करणे पूर्णत: अयोग्य ठरते. तसेच प्रसुती कक्षाच्या छताची अवस्था वाईट असून हे छत कोसळण्याच्या मार्गावर आहे. छत कोसळून केव्हाही जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या आरोग्य केंद्र परिसरात पाण्याच्या सुविधेसाठी विहीर खोदण्यात आली आहे. मात्र या विहिरीच्या प्लेटफार्मची अवस्था बकाल झाली आहे. या विहिरीच्या सभोवताल गवत उगवले असून विहिरीच्या ओट्याचे काँक्रीट पूर्णत: फुटलेले आहे. सदर विहिरीतील पाणी दूषित झाले असल्याने या परिसरातील रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना ग्राम पंचायतीच्या सार्वजनिक नळाचा अथवा इतर सार्वजनिक विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. यात रूग्णांच्या नातेवाईकांची भटकंती सुरू असते. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने काही शासकीय निवासस्थानाला नळ कनेक्शन दिले आहे. परंतु बºयाच निवासस्थानांना नळ कनेक्शन देण्यात ग्रामपंचायत प्रशासनाने नकार दिल्याने येथील आरोग्य कर्मचाºयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. महिला कर्मचारी निवासस्थानाचे दरवाजे तुटून पडले आहेत. सातत्याने मागणी करूनही गेल्या अनेक महिन्यांपासून आरोग्य विभागाने सदर निवासस्थान दुरूस्तीसाठी प्रयत्न केले नाही. इमारत गळत असल्याने ताडपत्री टाकून काम चालविले जात आहे.रिक्त पदाने सेवेवर परिणाममुरूमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिकेची तीन, आरोग्य सेवकाची दोन, सफाई कामाराची एक व इतर अनेक पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे रूग्णांना वेळेवर योग्य औषधोपचार येथे मिळत नाही. केंद्राची आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे.इमारत दुरूस्तीचा प्रस्ताव पडूनमुरूमाव प्राथमिक आरोग्य केंद्र प्रशासनाच्या वतीने सदर इमारतीच्या दुरूस्तीचा प्रस्ताव तयार करून हा प्रस्ताव तालुका आरोग्य अधिकाºयांमार्फत जि.प.च्या आरोग्य विभागाला पाठविण्यात आला. मात्र सहा महिने उलटूनही दुरूस्तीच्या प्रस्तावाला मंजुरी प्रदान करण्यात आली नाही