शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद शाळा नक्षलवाद्यांचा अड्डा

By admin | Updated: August 5, 2015 01:34 IST

जिल्ह्याच्या दुर्गम व संवेदनशील भागात जिल्हा परिषदेच्या शाळा व आरोग्य केंद्र नक्षलवादी आपल्या कामासाठी वापरत असल्याचे पोलीस यंत्रणेला आढळून आले आहे.

पोलीस विभागाची राहणार नजर : शाळेत नक्षल साहित्य सापडल्याने खळबळगडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम व संवेदनशील भागात जिल्हा परिषदेच्या शाळा व आरोग्य केंद्र नक्षलवादी आपल्या कामासाठी वापरत असल्याचे पोलीस यंत्रणेला आढळून आले आहे. सरकारी अधिपत्याखालील या संस्थांचा वापर माओवादी करीत असल्यामुळे पोलीस यंत्रणा आता यादृष्टीने आपली करडी नजर ठेवणार आहे.नक्षलवाद्यांच्या संघटनांतर्फे २८ जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत शहीद सप्ताह साजरा करण्यात आला. या दरम्यान अहेरी तालुक्याच्या रेपनपल्ली पोलीस मदत केंद्रांतर्गत लिंगमपल्ली येथे जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीत नक्षल साहित्य मिळून आले. त्यामुळे शाळांचा वापर नक्षलवादी आपल्या कामासाठी करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस प्रशासनाने यादृष्टीने आता आरोग्य केंद्र व शासनाच्या इतर विभागाच्या कार्यालयांवरही आपले लक्ष आता केंद्रीत केले आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्य केंद्रातून मोठ्या प्रमाणावर औषधीचा साठा माओवाद्यांकडे जातो. ही बाब यापूर्वीही गडचिरोली पोलीस दलाला आढळून आली होती. चकमकीनंतर जप्त करण्यात आलेल्या साहित्यात औषधी मोठ्या प्रमाणावर होती. ही औषधी शासनाकडून पुरवठा होणाऱ्या औषधीच्या प्रकारात मोडणारी होती. हा प्रकार दोन-तीन वर्षांपूर्वी दिसून आला होता. त्यानंतर आता जिल्हा परिषद शाळेची इमारतच माओवादी वापरत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलीस दलातही खळबळ उडाली आहे. पोलीस शाळा वापरतात म्हणून एकीकडे माओवादी जिल्ह्यात शाळा इमारतींना टार्गेट करून नुकसान पोहोचवित होते. बडाझेलिया या धानोरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत नक्षलवाद्यांनी बॉम्ब स्फोट घडविला होता. आता मात्र शाळा इमारती माओवादी वापरत आहे. हे लिंगमपल्लीच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे व शाळेचा वापर त्यांच्यासाठी होतो, हे प्रथमदर्शनीच आढळून आल्याचे पोलीस प्रशासनानेही कबूल केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)