शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीच्या नगराध्यक्षपदी अश्विनी धात्रक विराजमान

By admin | Updated: September 19, 2015 01:57 IST

येथील नगर परिषदेच्या अध्यक्ष म्हणून डॉ. अश्विनी धात्रक (यादव) यांच्या नावाची शुक्रवारी पार पडलेल्या विशेष सभेत घोषणा करण्यात आली.

अविरोध निवड : पालिकेतील सत्ता संघर्षाला पूर्णविरामगडचिरोली : येथील नगर परिषदेच्या अध्यक्ष म्हणून डॉ. अश्विनी धात्रक (यादव) यांच्या नावाची शुक्रवारी पार पडलेल्या विशेष सभेत घोषणा करण्यात आली. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डॉ. अश्विनी धात्रक यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची शुक्रवारी अध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली. यापूर्वीच्या नगराध्यक्ष निर्मला मडके यांनी ३ सप्टेंबरला आपल्या पदाचा राजीनामा दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी राजीनामा मंजूर केल्यानंतर नवीन नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु झाली. त्यानुसार ११ सप्टेंबरला मुख्याधिकाऱ्यांकडे नगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करावयाचे होते. मात्र नगरसेविका डॉ.अश्विनी धात्रक यांचा एकमेव अर्ज पीठासीन अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज मंजूर केला. त्यामुळे डॉ.अश्विनी धात्रक यांच्या नावावर तेव्हाच शिक्कामोर्तब झाले होते. परंतु निवडणूक विभागाच्या प्रकियेनुसार शुक्रवारी विशेष सभा बोलाविण्यात आली. या सभेत २५ नगरसेवकांपैकी १८ नगरसेवक उपस्थित होते. पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवणे यांनी प्रक्रियेचे वाचन करुन डॉ. अश्विनी धात्रक (यादव) यांचा एकमेव अर्ज नगराध्यक्षपदासाठी आल्याची माहिती उपस्थित नगरसेवकांना दिली. त्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष म्हणून डॉ.अश्विनी धात्रक यांचे नाव जाहीर केले. यावेळी नगर पालिकेचे गट नेते प्रा.राजेश कात्रटवार, नगरसेवक सुरेश पोरेड्डीवार, विजय गोरडवार, रमेश चौधरी, भूपेश कुळमेथे, संजय मेश्राम, संध्या उईके, मीनल चिमूरकर, नंदू कायरकर, बेबीताई चिचघरे, शारदा दामले, सुषमा राऊत, लता मुरकुटे, अजय भांडेकर, अ‍ॅड. प्रशांत उर्फ बाळू आखाडे व नामनिर्देशीत सदस्य नितीन कामडी उपस्थित होते. तसेच विशेष सभेला पालिकेचे मुख्याधिकारी गिरीष बन्नोरे व कर्मचारी बी. एम. शेंडे उपस्थित होते. सर्व नगरसेवक व कार्यकर्त्यांनी डॉ.अश्विनी धात्रक यांचे अभिनंदन करुन फटाक्यांच्या आतिषबाजीने आनंद व्यक्त केला.विशेष म्हणजे, या सभेला आनंद शृंगारपवार, माजी नगराध्यक्ष निर्मला मडके, सचिन बोबाटे, माधुरी खोब्रागडे, पुष्पा कुमरे, चेतना ठाकरे व नामनिर्देशीत सदस्य श्रीकांत भृगूवार हे नगरसेवक अनुपस्थित होते. यावेळी गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विजय पुराणीक यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (स्थानिक प्रतिनिधी)धात्रक यांनी पदभार स्वीकारलागडचिरोली नगर पालिकेच्या नवनियुक्त अध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक (यादव) यांनी शुक्रवारी अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांचे गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवणे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नगर पालिकेच्या माध्यमातून शहराचा सर्वांगिण विकास गतीने करण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखविला.