शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

लाेकांना काेट्यवधीचा गंडा घालून ‘ते’ एजंट झाले जिल्ह्यातून पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 05:00 IST

कमी किमतीत दुचाकी वाहन मिळवून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या एजंटांनी  संबंधितांकडून राेख रकमेसाेबत त्यांचे आधार आणि पॅन कार्ड तसेच इतर काही आवश्यक कागदपत्रे घेतली. तसेच त्यांच्याकडून काही अर्जांवर सह्या घेतल्या. त्या आधारे काही फायनान्स कंपन्यांकडून दुचाकी वाहनासाठी त्यांच्या नावावर कर्ज उचलले. परंतु त्याची वाहनधारकांना कल्पनाच नव्हती. आपण दुचाकीचे पैसे राेख स्वरूपात भरले आहेत, अशीच त्यांची धारणा हाेती. परंतु प्रत्यक्षात ते पैसे एजंटच्या रूपात आलेल्या भामट्यांनी लाटून पाेबारा केला.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : नवीन दुचाकी वाहन कमी किमतीत मिळवून देण्याचे आमिष दाखवत शेकडाे नागरिकांना काेट्यवधी रुपयांनी गंडा घातल्याचा प्रकार जिल्ह्यात घडला आहे. या प्रकरणी काही नागरिकांनी पाेलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. मात्र अद्याप हे प्रकरण चाैकशीत असून, लवकरच गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पाेलिसांनी दिली. प्राप्त माहितीनुसार गेल्या एक ते दीड वर्षातील लाॅकडाऊनच्या काळात फायनान्स कंपनीचे एजंट म्हणून काम करणाऱ्या काही लाेकांनी ग्रामीण भागातील नागरिकांना नवीन दुचाकी वाहन १० ते १५ हजार रुपयांची सूट देऊन मिळवून देण्याचे आमिष नागरिकांना दाखविले. त्यासाठी दुचाकीची किमत राेख स्वरूपात भरावी लागेल, अशी अट टाकली. लाॅकडाऊनमुळे बस आणि इतर प्रवासी वाहने बंद असल्यामुळे नागरिकांना स्वत:च्या वाहनाची गरज निर्माण झाली. त्यातच १० ते १२ हजार रुपये कमी किमतीने वाहन मिळत असल्याचे पाहून अनेकजण त्या आमिषाला बळी पडले. अनेकांनी इकडून-तिकडून पैशाची जुळवाजुळव करत प्रतिवाहन ६० ते ६२ हजार रुपये ‘त्या’ एजंटकडे माेठ्या विश्वासाने दिले. एवढेच नाही तर पैसे देणाऱ्यांना नवीन दुचाकी वाहनही मिळाले. पण हे वाहन आपण भरलेल्या  पैशातून नाही तर आपल्या नावावर काढलेल्या कर्जातून दिल्या गेल्याचे कळताच स्वस्तात वाहन मिळाल्याच्या आनंदात असणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. 

फायनान्स कंपन्यांचाही हात?कमी किमतीत दुचाकी वाहन मिळवून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या एजंटांनी  संबंधितांकडून राेख रकमेसाेबत त्यांचे आधार आणि पॅन कार्ड तसेच इतर काही आवश्यक कागदपत्रे घेतली. तसेच त्यांच्याकडून काही अर्जांवर सह्या घेतल्या. त्या आधारे काही फायनान्स कंपन्यांकडून दुचाकी वाहनासाठी त्यांच्या नावावर कर्ज उचलले. परंतु त्याची वाहनधारकांना कल्पनाच नव्हती. आपण दुचाकीचे पैसे राेख स्वरूपात भरले आहेत, अशीच त्यांची धारणा हाेती. परंतु प्रत्यक्षात ते पैसे एजंटच्या रूपात आलेल्या भामट्यांनी लाटून पाेबारा केला. अशा पद्धतीने कर्जदाराला समाेरासमोर उभे न करता परस्पर कर्ज देणाऱ्या फायनान्स कंपन्यांतील व्यक्तींचाही या फसवणुकीत हात असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. 

इतर जिल्ह्यातही फसवणूककर्ज वसुलीसाठी फायनान्स कंपनीचे लाेक दारी आल्यानंतर वाहनधारकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी संबंधित एजंटचा शाेध घेण्याचा प्रयत्न केला; पण काेणीही सापडले नाही. त्यामुळे चार दिवसांपूर्वी कुरखेडा आणि गडचिराेली पाेलीस स्टेशनमध्ये काही लाेकांनी धाव घेत तक्रार दाखल केली.  अशा पद्धतीने फसवणूक करणाऱ्यांचे जाळे लगतच्या चंद्रपूर आणि इतर काही जिल्ह्यांत पसरले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

या प्रकरणाची वरिष्ठांच्या मार्गदर्शनात चाैकशी सुरू असून, लवकरच गुन्हा दाखल करत आहाेत. प्रकरणाची व्याप्ती माेठी आहे. त्यामुळे सबळ पुरावे गाेळा केले जात आहेत. - प्रमाेद बानबले, पाेलीस निरीक्षक, गडचिराेली पाेलीस स्टेशन

 

टॅग्स :fraudधोकेबाजी