शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

फुटपाथ दुकानदारांसाठी होणार हॉकर्स झोन

By admin | Updated: July 15, 2016 01:40 IST

राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत शहरात अतिक्रमण करून रस्त्याच्या बाजुला दुकाने थाटलेल्या दुकानदारांसाठी स्वतंत्र हॉकर्स झोन निर्माण केले जाणार आहे.

प्राथमिक सर्वेक्षण अंतिम टप्प्यात : गडचिरोली शहरात एक हजार व्यावसायिकांना दिलासा मिळणार दिगांबर जवादे गडचिरोली राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत शहरात अतिक्रमण करून रस्त्याच्या बाजुला दुकाने थाटलेल्या दुकानदारांसाठी स्वतंत्र हॉकर्स झोन निर्माण केले जाणार आहे. यासाठी प्राथमिक स्वरूपाचे सर्वेक्षण करण्याचे काम नगर परिषदेच्या वतीने हाती घेतले आहे. प्रत्येक बेरोजगार युवकाला रोजगार मिळावा, यासाठी शासनाकडून प्रयत्न चालविले जात आहेत. मात्र ज्या व्यक्तींना लहान-मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे. तो व्यवसाय मात्र अतिक्रमणाच्या मोहिमेत नष्ट होण्याचा धोका आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या बाजुला वाढत्या अतिक्रमणामुळे अपघातांचेही प्रमाण वाढत चालले आहे. अतिक्रमण काढल्यास हातचा रोजगार हिसकावल्या जाईल व बेरोजगारांची संख्या वाढेल. हा सुद्धा धोका समोर येत आहे. या अतिक्रमीत दुकानदारांना त्यांना हक्काची जागा उपलब्ध व्हावी, यासाठी आता केंद्र शासनाने पाऊल उचलणे सुरू केले आहे. केंद्र शासनाने राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान सुरू केले असून या अभियानातील फेरीवाला धोरण अंतर्गत अशा अतिक्रमीत दुकानदारांसाठी स्वतंत्र इमारत बांधून देण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी हॉकर्स झोन तयार केले जाणार आहे. यासाठी शहरातील अतिक्रमण करून दुकाने थाटलेल्या व्यावसायिकांचे सर्वेक्षण करण्याचे काम नगर परिषदेने सुरू केले आहे. आजपर्यंत जवळपास ६०० दुकानदारांचा सर्वेक्षण करण्यात आला असून या सर्वेक्षणमध्ये संबंधित व्यक्तीचे नाव तो कोणता व्यवसाय करीत आहे, कुठे व्यवसाय करीत आहे, किती वर्षापासून व्यवसाय चालवित आहे, त्याच्या शैक्षणिक व कौटुंबिक माहिती मागितली आहे. या सर्वेक्षणाच्या आधारे शहरातील अतिक्रमीत दुकानांचा अंदाज घेऊन त्यानुसार पुढील रूपरेषा आखली जाणार आहे. व्यवसायानुसार स्वतंत्र हॉकर्स झोन तयार केले जाणार असल्याने ग्राहकांना एकाच ठिकाणी वस्तू मिळणार आहे. बायोमेट्रिक सर्वेक्षण होणार प्राथमिक सर्वेक्षणामध्ये केवळ नाव, व्यवसाय, शैक्षणिक पात्रता यांची माहिती मागितली आहे. प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर सदर दुकानदारांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये दुकानाचा फोटो, दुकानदाराचा फोटो, त्याचा आधार कार्ड, त्याचा थंब, शैक्षणिक दाखले व घेतले जाणार आहेत. त्यानंतर सदर दुकानदारांना नगर परिषदेच्या वतीने व्यवसायाबाबातचे ओळखपत्र सुध्दा दिले जाणार आहे. एक हजाराहून अधिक व्यावसायिकांना मिळणार लाभ नगर परिषदेने चारही मुख्य मार्गावरील अतिक्रमीत दुकानदारांचे सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये जवळपास ६०० दुकानदार आढळून आले आहेत. शहराच्या अंतर्गत भागात जवळपास ४०० अतिक्रमणधारक व्यावसायिक असण्याची शक्यता आहे. असे एकूण जवळपास एक हजार दुकानदारांना याचा लाभ मिळणार आहे.