शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट पुलाने रहदारीस अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 01:07 IST

एटापल्ली ते भामरागड या दोन तालुकास्थळातील अंतर ७० ते ७५ किमी आहे. हे ७५ किमीचे अंतर गाठण्यासाठी कोठी ते गट्टादरम्यान दोन पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले.

ठळक मुद्देकोठी व गट्टा भागातील वास्तव : एटापल्ली-भामरागड तालुक्याचा थेट संपर्क नाही

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : एटापल्ली ते भामरागड या दोन तालुकास्थळातील अंतर ७० ते ७५ किमी आहे. हे ७५ किमीचे अंतर गाठण्यासाठी कोठी ते गट्टादरम्यान दोन पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले. मात्र तब्बल दोन दशकापासून या दोन्ही पुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे या दोन तालुक्याची रहदारी होण्यासाठी प्रचंड अडचण निर्माण झाली आहे. परिणामी या दोन तालुक्याचा थेट संबंध प्रस्तापित होण्यास आडकाठी निर्माण झाली आहे.भामरागड तालुक्यातून एटापल्ली तालुक्यात जाण्यासाठी कोठी व गट्टा हे दोन मोठे गाव पडतात. भामरागडपासून कोठी हे गाव २० किमी अंतरावर आहे. कोठीपर्यंत नियमितपणे अहेरीवरून राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा सुरू आहे. तर अहेरी, एटापल्लीवरून गट्टापर्यंत ३५ ते ४० किमी अंतरापर्यंत बससेवा नियमितपणे सुरू आहे. केवळ गट्टा-कोठी दरम्यान १५ ते १८ किमी रस्त्यामध्ये दोन पुलाचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे एटापल्ली ते भामरागड या दोन तालुक्याचा संपर्क मार्गात वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. उन्हाळ्यात पेपरमिल सुरू होताच रस्त्याची दुरूस्ती केली जाते. अन्यथा १२ महिने सदर रस्त्यावरील वाहतूक बंद राहते. त्यामुळे आलापल्लीवरून एटापल्लीला जाण्यासाठी अधिकचे अंतर कापावे लागते. कोठी व गट्टा या दोन नाल्यावरील पुलाच्या बांधकामास सन १९९६-९७ मध्ये मंजुरी मिळाली. बीआरओच्या माध्यमातून या पुलाचे काम सुरू करण्यात आले. बीआरओ निघून गेल्यानंतर या पुलाचे बांधकाम पुन्हा हाती घेण्यात आले नाही. यानंतर सदर पुलाच्या बांधकामाबाबत प्रशासनाने पुढाकार घेतला नाही. एकूणच रस्ता व पूल निर्मितीच्या कामात भामरागड तालुक्यावर सातत्याने अन्याय होत आहे.नागरिकांवर पडतो आर्थिक भुर्दंडकोठी-गट्टा दरम्यान मार्गावरील दोन्ही पुलाचे काम गेल्या दोन दशकापासून अर्धवट स्थितीत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना भामरागड व एटापल्लीला येण्यासाठी अधिकचे अंतर कापून यावे लागते. यासाठी प्रवासापोटी अधिक पैसे मोजावे लागतात. कोठी ते एटापल्ली मार्गावरील कारमपल्ली, हलवेर, कोयर, पिडमिली आदी परिसरातील नागरिकांना आलापल्लीवरून अधिकचे अंतर कापून तालुका मुख्यालयी यावे लागते. तसेच गट्टा, जांभिया, अडेंगा, सुरजागड, मंगेर, हेडरी, नेंडेर, परसलगोंदी, आलदंडी, तुमरगुंडा, वांगेतुरी, तोडगट्टा, आरेवाडा परिसरातील नागरिकांना एटापल्ली, आलापल्लीवरून भामरागडला यावे लागते.