शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळांमध्ये निम्मेच विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 23:14 IST

गडचिरोली प्रकल्पांतर्गत येणाºया २४ आश्रमशाळांची विद्यार्थी प्रवेश क्षमता १२ हजार ४५० एवढी आहे.

ठळक मुद्देगडचिरोली प्रकल्पातील भयावह वास्तव : १२ हजार ४५० पैकी केवळ ७ हजार १८१ विद्यार्थ्यांचे प्रवेश

दिगांबर जवादे। लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली प्रकल्पांतर्गत येणाºया २४ आश्रमशाळांची विद्यार्थी प्रवेश क्षमता १२ हजार ४५० एवढी आहे. मात्र चालू शैक्षणिक सत्रात केवळ ७ हजार १८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून ५ हजार ३१९ जागा शिल्लक आहेत.जंगल भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासींच्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी शासनाने निवासाची सुविधा असलेल्या आश्रमशाळा निर्माण केल्या. गडचिरोली आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत एकूण २४ शासकीय आश्रमशाळा आहेत. यातील सर्वच शाळांमध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध होती. मात्र मागील काही दिवसांपासून आदिवासीबहूल भागातील परिस्थिती बदलली आहे. ‘गाव तिथे शाळा’ या धोरणांतर्गत शासनाने गावागावात शाळा सुरू केल्या. त्याचबरोबर आश्रमशाळांची असलेली दुरावस्था यामुळे पालक आपल्या पाल्याला आश्रमशाळेत पाठविण्यास तयार होत नाही. परिणामी मागील सात ते आठ वर्षांपासून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची संख्या घटत चालली आहे.गडचिरोली प्रकल्पातील २४ शासकीय आश्रमशाळांची विद्यार्थी प्रवेश क्षमता १२ हजार ४५० एवढी आहे. मात्र २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात केवळ ७ हजार १८१ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. यामध्ये ३ हजार ५६२ मुले व ३ हजार ६१९ मुलींचा समावेश आहे. सुमारे २ हजार ४८८ विद्यार्थ्यांच्या तर २ हजार ८३१ विद्यार्थिनींच्या जागा शिल्लक आहेत. एकेकाळी आश्रमशाळेत प्रवेशाची मेरीट लिस्ट लागत होती. आता मात्र कर्मचाºयांना शोध माहीम राबवावी लागत आहे.चार आश्रमशाळांचे प्राथमिक वर्ग बंदमाध्यमिकच्या तुलनेत प्राथमिक वर्गांची विद्यार्थी संख्या कमालीची घटत चालली होती. काही वर्गांमध्ये २ ते ३ पर्यंत विद्यार्थी शिकत होते. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांवर महिन्याकाठी लाखो रूपये खर्च होत होते. या अनावश्यक खर्चावर लगाम घालण्याठी शासनाने पहिली ते चवथी पर्यंतच्या वर्गांची विद्यार्थी संख्या २० पेक्षा कमी असल्यास हे चारही वर्ग बंद करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला. त्यानुसार गडचिरोली प्रकल्पातील आरमोरी तालुक्यातील भाकरोंडी, कुरंडीमाल, चामोर्शी तालुक्यातील भाडभिडी, कुरखेडा तालुक्यातील घाटी या चार आश्रमशाळांमधील प्राथमिक वर्ग बंद करण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांना दुसºया शाळेत स्थानांतरित करण्यात आले आहे. हा नियम पुढेही कायम राहणार असल्याने इतरही आश्रमशाळांचे प्राथमिक वर्ग धोक्यात आले आहेत. आश्रमशाळांची पटसंख्या टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाºयांना भविष्यात पेलावे लागणार आहे.मागील वर्षीच्या तुलनेत ३८६ विद्यार्थी वाढलेमागील वर्षी शासकीय आश्रमशाळांमध्ये ६ हजार ७९५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यामध्ये ३ हजार ३७६ मुले व ३ हजार ४१९ मुलींचा समावेश आहे. यावर्षी मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ३८६ विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढले आहेत. चालू वर्षात एकूण ७ हजार १८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. विशेष म्हणजे, उच्च माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांची संख्या वाढली असल्याचे दिसून येत आहे.