शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
2
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
3
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
4
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
5
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
6
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
7
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
8
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
9
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
10
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
11
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?
12
"झारखंडमध्ये करण्यात आली रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी'; लव्ह जिहादवर भाष्य करत PM मोदी जोरदार बरसले
13
उद्धव ठाकरे, संजय राऊत परदेशात; १ जूनच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी मारणार?
14
रियान परागने सारा-अनन्याचे हॉट फोटो सर्च केले; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
15
"मी पण कलेक्टर बनणार"; टीव्हीवर सूर्यवंशम सिनेमा पाहून UPSC परीक्षा दिली अन्...
16
तरुणी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
17
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
18
मुंबई कोस्टल रोडवर श्रद्धा कपूरने चालवली Lamborghini; म्हणाली, 'लेट नाईट ड्राईव्ह...'
19
सेन्सेक्स-निफ्टीनं तेजी गमावली; डिव्हिस लॅब्सचे शेअर वाढले, अदानी समूहाचे सर्व शेअर पडले
20
२२व्या वर्षी अवनीत कौर झाली Engaged? बोटातील रिंग दाखवत म्हणाली- "चांगल्या गोष्टी..."

निम्म्याच शाळा प्रगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 11:28 PM

शिक्षण विभागाने ठरवून दिलेले २५ निकष पूर्ण करणाºया शाळेला प्रगत शाळा म्हणून घोषित केले जाते.

ठळक मुद्देमोहीम थंडावली : शाळांमध्ये सोईसुविधांचा अभाव; शिक्षकांचे मन लागेना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शिक्षण विभागाने ठरवून दिलेले २५ निकष पूर्ण करणाºया शाळेला प्रगत शाळा म्हणून घोषित केले जाते. गडचिरोली जिल्ह्यात एकूण २ हजार २३ शाळा आहेत. यापैकी केवळ १ हजार ३७ शाळा प्रगत असून सुमारे ९८६ शाळा प्रगतसाठी अजूनही संघर्ष करीत आहेत.प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रमाअंतर्गत २२ जून २०१६ रोजी राज्य शासनाने प्रगत शाळेचे २५ निकष ठरवून दिले. यामध्ये शाळेतील भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची उपस्थिती, अध्यापनात डिजिटल साधनांचा वापर, पायाभूत चाचणीतील विद्यार्थ्यांचे गुण, त्या वर्गाच्या विद्यार्थ्यांमधील अध्यापन क्षमता, विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शाळेच्या मार्फत राबविले जाणारे विविध उपक्रम आदींचा समावेश आहे. ही किमान २५ निकष पूर्ण करणाºया शाळेला प्रगत शाळा म्हणून घोषित केले जाते.शासन निर्णय काढल्यानंतर शाळा प्रगत करण्यासाठी मागील वर्षीच्या शैक्षणिक सत्रात शाळा, केंद्र व जिल्ह्यात मोठी स्पर्धा होत होती. शाळा प्रगत व्हावी, यासाठी शिक्षक धडपडतही होते. शाळा प्रगत करण्यासाठी शिक्षण विभागावर दबाव होता. यावर्षी मात्र हा दबाव पूर्णपणे हटल्याने शिक्षकांनी शाळांमध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी शाळा प्रगत करण्याची मोहीम थंडावली असल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात १ हजार २०२ प्राथमिक शाळा, ८२१ उच्च प्राथमिक शाळा अशा एकूण २ हजार २३ शाळा आहेत. त्यापैकी ६९१ प्राथमिक शाळा व ३४६ उच्च प्राथमिक शाळा प्रगत म्हणून घोषित केल्या आहेत. अजूनही ३२१ प्राथमिक शाळा व ४७५ उच्च प्राथमिक शाळा अप्रगत आहेत. या शाळांना प्रगतशील शाळा असे संबोधण्यात आले आहेत. उर्वरित शाळांमध्येही सोयीसुविधा उपलब्ध करून देऊन त्या प्रगत करण्याची मागणी होत आहे.अध्यापनापेक्षा बदलीकडेच जास्त लक्षग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रक्रियेत पूर्णपणे बदल केला आहे. मे महिन्यात शिक्षकांच्या बदल्या नाही. बदलीपात्र शिक्षकांकडून वेळोवेळी माहिती मागितली जात आहे. याच प्रक्रियेत शिक्षकवर्ग मागील चार महिन्यांपासून अडकला आहे. अध्यापनापेक्षा बदलीच्याच चर्चा शिक्षकांमध्ये अधिक होत असल्याचे दिसून येत आहे.