शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

हलबा समाजाची जिल्हा कचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 23:36 IST

हलबा समाजाला अनुसूचित जमातीच्या योजनांचा लाभ देण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी हलबा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मशाल मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देमशाल मोर्चा : जिल्हाधिकारी व मंत्र्यांना निवेदन

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : हलबा समाजाला अनुसूचित जमातीच्या योजनांचा लाभ देण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी हलबा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते.मोर्चाच्यापूर्वी इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला भाजपचे आमदार विकास कुंभारे यांनी मार्गदर्शन केले. हलबा समाजाला भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३४२ नुसार आरक्षण दिले आहे. मात्र राज्य व केंद्र शासन मागील २५ वर्षांपासून आरक्षणाचा लाभ देण्यास टाळाटाळ करीत आहे. आरक्षण हा हलबा समाजाचा हक्क असून या हक्कासाठी संवैधानिक मार्गाने आरपारची लढाई करण्यासाठी सज्ज राहावे, असे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले. त्यानंतर इंदिरा गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मशाल मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम व अनुसूचित जाती कल्याण समिती सदस्यांना निवेदन दिले. हलबा समाजाची मागणी रास्त असून केंद्र व राज्य शासनाकडे याबाबत पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले.मोर्चाचे नेतृत्व आमदार विकास कुंभारे, उदय धकाते, डॉ. शिवनाथ कुंभारे, धनंजय धार्मिक, छायाताई कुंभारे, संजय निखारे, वामदेव सोनकुसरे, शरद सोनकसुरे, अनिल धकाते यांनी केले. मोर्चात महादेव कुंभारे, रमेश निखारे, हरिदास कुंभारे, सुरज कवाडघरे, सूचिता धकाते, कुंदा निखारे, ममता धकाते, निलिमा तळोदीकर, शिला सोरते, पुष्पा नंदनवार, वैशाली धकाते, प्रशांत नंदनवार, अशोक धकाते, रूपराम निमजे, विनोद धकाते, भाष्कर बोकडे, भरत निमजे, सिंधू धकाते, विजय हेडाऊ, आनंदराव सोनकुसरे, आरती बोकडे यांच्यासह शेकडो हलबा आदिवासी जमातीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. सभेचे संचालन शिवानंद सहारकर यांनी केले.या मोर्चात चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, वर्धा, अमरावती जिल्ह्यातील शेकडो समाज बांधव सहभागी झाले होते.