लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शाळा, महाविद्यालयातील प्रत्यक्ष वर्ग बंद असून ३१ जुलैपर्यंत बंद राहण्याबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. मात्र शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांना कर्तव्यावर जाणे बंधनकारक आहे. मात्र अहेरी उपविभागाच्या दुर्गम भागातील अनेक शाळांमध्ये शिक्षक जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. दुर्गम भागातील शाळा व गावांमध्ये गुरूजींचे दर्शनच होत नसल्याचे अनेक ग्रामस्थांनी सांगितले आहे.शासनाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. दरम्यान शाळा, महाविद्यालय व कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी ११ जुलै २०२० रोजी काढले. परंतु शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आवश्यक कामासाठी प्रत्यक्ष शाळा व महाविद्यालयात व मुख्यालयी कर्तव्यावर उपस्थित राहण्याचे आदेशात नमूद केले आहे. जिल्ह्याच्या दुर्गम भागातील शिक्षक अद्याप शाळेच्या गावी पोहोचले नसून जिल्हा व तालुकास्थळ तळ ठोकून बसले आहेत. त्यामुळे आदिवासी भागातील काही शाळांमध्ये मार्च महिन्यापासून गुरूजींचे दर्शनच झाले नसल्याची माहिती आहे.सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, अहेरी, कोरची व धानोरा हे तालुके दुर्गम भागात मोडत असून या तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. यावर्षीचे शैक्षणिक सत्र २६ जूनपासून सुरू झाले. मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांनी ३१ जुलैपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश काढले. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अध्ययन व अध्यापनाची प्रक्रिया सुरू आहे.दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक तेथील लोकांच्या अज्ञानी व साध्यापणाचा फायदा घेऊन शाळा बंद असल्याची माहिती पसरवून आपल्या घरीच बसले आहेत. परिणामी ग्रामीण भागातील विद्यार्थी पालकासोबत शेतावर नाईलाजाने जात आहेत. जिल्हाधिकाºयांनी सर्व शिक्षकांना मुख्यालयी राहून कर्तव्य पार पाडण्याचे आदेश दिले आहेत.मात्र जिल्हा परिषदेचे काही शिक्षक या आदेशाला हरताळ फासत असल्याचे दिसून येत आहे. अशा शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहेत.पर्यवेक्षीय यंत्रणा उदासीनजिल्हा परिषदेच्या शाळा, तेथील शिक्षणाची प्रक्रिया व इतर बाबींवर गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांची देखरेख असते. संबंधित शाळेला भेटी देऊन माहिती जाणून घेण्याची जबाबदारी या पर्यवेक्षीय यंत्रणेवर आहे. मात्र अहेरी उपविभागातील दुर्गम शाळांच्या शिक्षकांच्या देखरेखीबाबत या यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. जिल्हा, तालुकास्थळावरून शाळा पाहणाºया शिक्षकांवर कारवाई करणे गरजेचे आहे.