शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

... अन् बंदूक चालविणारे हात पापड, लोणचं बनविण्यासाठी सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 13:41 IST

पूर्वाश्रमीच्या जहाल महिला नक्षली आता चक्क पापड, लोणची, मसाला बनवून स्वयंरोजगाराकडे वाटचाल करणार आहेत. ही किमया जिल्हा पोलीस दल आणि स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेने घडविली आहे.

ठळक मुद्देआत्मसमर्पित महिला नक्षलींनी घेतले स्वयंरोजगाराचे धडे, आरसेटी आणि जिल्हा पोलीस दलाचा संयुक्त उपक्रम

मनोज ताजनेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोलीच्या जंगलात मुक्तसंचार करत बिनधास्तपणे बंदूक चालविणाऱ्या, किंबहुना अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पूर्वाश्रमीच्या जहाल महिला नक्षली आता चक्क पापड, लोणची, मसाला बनवून स्वयंरोजगाराकडे वाटचाल करणार आहेत. ही किमया जिल्हा पोलीस दल आणि स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेने घडविली. आत्मसमर्पित महिला नक्षलींच्या पुनर्वसनाचा एक भाग म्हणून त्यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आणि त्यांनी आनंदाने ते पूर्णही केले. 

नक्षल चळवळीत महिलांची संख्या बऱ्याच प्रमाणात आहे. अजाणत्या वयात नक्षल चळवळीत गेल्या, पण सज्ञान झाल्यानंतर पदरी पडली ती केवळ निराशा. त्यामुळे शासनाच्या आत्मसमर्पण योजनेला प्रतिसाद देत नवजीवनाला सुरुवात करण्यासाठी गेल्या काही वर्षांत अनेक नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे शस्र ठेवले. त्यांच्यासाठी गडचिरोलीत स्वतंत्र वसाहतही उभारण्यात आली. त्यातील महिला नक्षलवाद्यांनी स्वयंपूर्ण व्हावे, स्वयंरोजगार सुरू करावा यासाठी त्यांना विविध पदार्थ तयार करण्याचे दहा दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. पोलीस विभागाच्या पुढाकाराने ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या अधिपत्याखालील स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, आरसेटी गडचिरोली यांनी हे प्रशिक्षण दिले.

शुक्रवारी (दि.२३) या प्रशिक्षणाचा समारोप झाला. त्यानिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख (प्रशासन), संस्थेचे संचालक चेतन वैद्य यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पित महिला नक्षलींना प्रमाणपत्रांचे वाटप  झाले. कार्यक्रमाचे संचालन समन्वयक हेमंत मेश्राम यांनी केले. प्रशिक्षणासाठी पोलीस उपनिरीक्षक गंगाधर ढगे, सहकारी भय्याजी कुळसंगे, मधुकर रत्नम आदींनी परिश्रम घेतले.आयुष्यात कधीच  पापड बनविले नव्हतेएकेकाळी बंदूक हाती घेऊन दहशत पसरविणाऱ्या महिला नक्षली आत्मसमर्पणानंतर सर्वसामान्य जीवन जगत आहेत. त्यांना महिलांचे हक्क, अधिकार, कर्तव्ये तसेच व्यवसायातील स्पर्धा यांची जाणीव प्रशिक्षणाच्या माध्यमातून करून देण्यात आली. 

त्यांनी आपल्या आयुष्यात कधीच पापड,  लोणचे बनविले नाही अशांनी स्वमर्जीने या प्रशिक्षणात सहभाग नोंदविला. केवळ वस्तू उत्पादन न करता त्याची बाजारात विक्री कशी करता येईल याचेही मार्गदर्शन करण्यात आले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीjailतुरुंग