शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

विषय सहायकांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2017 01:47 IST

जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेत प्राचार्य रवींद्र रमतकर यांच्या अध्यक्षतेखाली ....

विकास संस्थेत सभा : अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्याचे आवाहन लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेत प्राचार्य रवींद्र रमतकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी विषय सहायकांची सभा पार पडली. या सभेला ज्येष्ठ अधिव्याख्याता धनंजय चापले, डॉ. विनित मत्ते, सचिन चव्हाण, डॉ. नरेश वैैद्य उपस्थित होते. जिल्हा निवड समितीमार्फत निवड प्रक्रियेतून प्रतिनियुक्तीने निवड झालेल्या विषय सहायकांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण विकास संस्थेची पूनर्रचना, विभागाचे माहिती डॉ. नरेश वैद्य यांनी दिली. धनंजय चापले यांनी पीएसएम मधील पायाभूत मूल्य, आरटीई २००९ मधील तरतुदींविषयी माहिती दिली. सचिन चव्हाण यांनी पायाभूत व संकलित चाचणी, माहिती संकलित करणे, अध्ययन समस्या याबाबत माहिती दिली. विषय साधन गटाचे विषय सहायक यांना आपापल्या विषयासाठी जिल्ह्यातील मूल शिकण्यासाठी प्रवृत्त करणे, शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांचे सक्षमीकरण करून अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्याचे निर्देश प्राचार्य रमतकर यांनी दिले. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम हा एक उपक्रम नसून योजना आहे. शेवटचे मूल शिकले पाहिजे. शिक्षकच नाही तर यंत्रणेतील सर्व घटकांनी तंत्रस्नेही होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्याला त्या वर्गातील प्रत्येक क्षमता १०० टक्के प्राप्त होणे म्हणजेच विद्यार्थी प्रगत होणे होय. याकरिता जिल्हा संसाधन गटाने नियोजन करावे, असे आवाहन प्राचार्य रवींद्र रमतकर यांनी केले. यावेळी विषय साधन गटाचे विषय सहायक डॉ. विजय रामटेके, कुणाल कोवे, संजय बिडवाईकर, प्रदीप पाटील, विठ्ठल होंडे उपस्थित होते.