शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

महिलांना व्यवसायाबाबत मार्गदर्शन

By admin | Updated: July 12, 2015 02:01 IST

बँक आॅफ इंडिया स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था गडचिरोली व को-आॅपरेटिव्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमाने बेरोजगार ...

आरमोरीत मेळावा : शेकडो बेरोजगारांची उपस्थिती; युवकांना केले जाणार कर्जाचे वितरणआरमोरी : बँक आॅफ इंडिया स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था गडचिरोली व को-आॅपरेटिव्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमाने बेरोजगार पुरूष व महिलांचा मेळावा शनिवारी आयोजित करण्यात आला. या मेळाव्यादरम्यान व्यवसायाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी राज्य प्रकल्प समन्वयक व्ही. एम. पोतदार, अग्रणी बँकेचे प्रबंधक डी. के. सिलारे, नाबार्डचे डी. डी. एम. कृष्णा कोल्हे, कोआॅपरेटीव्ह बँकेचे पुणेकर, टी. डी. कापकर, हेमंत मेश्राम, विद्या मेश्राम, एन. डी. दोनाडकर, एस. एस. मेश्राम, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना पोतदार म्हणाले की, दिवसेंदिवस शासकीय नोकरी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे बेरोजगार युवकांनी स्वत:चा रोजगार थाटून इतरांनाही रोजगार पुरविण्याचे स्वप्न बघावे, बँकांच्या मार्फतीने कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. आजचा बेरोजगार हा उद्याचा उत्तम उद्योजक बनला पाहिजे. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध प्रकारचे उद्योग स्थापन करण्याबाबत प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाचा लाभ उचलत युवकांनी स्वत:चा उद्योग स्थापन केला पाहिजे, असे आवाहन पोतदार यांनी केले. उद्योग स्थापन करून तो यशस्वीपणे चालविण्यासाठी जिद्द, मेहनत व चिकाटीची गरज आहे. मेहनत करणारा युवक रोजगारामध्ये निश्चितच यशस्वी होतो, असे मार्गदर्शन अग्रणी बँकेचे प्रबंधक सिलारे यांनी केले. यावेळी इतरही मान्यवरांनी मार्गदर्शन करून स्वत:चा उद्योग स्थापन करण्याचे आवाहन केले. मेळाव्याला आरमोरी परिसरातील अनेक युवक व युवती उपस्थित होत्या. मेळाव्यातील मार्गदर्शनानंतर जे युवक उद्योग स्थापन करण्यासाठी तयार होणार आहेत, त्याची चाचपणी करून कर्जाचे वितरण करण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)