ऑनलाईन लोकमतमुलचेरा : खेरवडी सोशल वेलफेअर असोसिएशन मुंबई व नगरपंचायत मुलचेरा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता विषयक जाणीवजागृती मार्गदर्शन कार्यक्रम स्थानिक शहीद वीर बाबुराव सेडमाके सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नायब तहसीलार समशेर पठाण, नगराध्यक्ष सुभाष आत्राम, प्रमुख मार्गदर्शक म्हणून मिलिंद पाठक, सहा.पो.नि. सुनीता कुसनाके, सभापती कविता मडावी, वनिता आलाम, पोलीस पाटील उषा पेंदाम, नगरसेविका अल्का मेयर, नगरसेवक प्रमोद गोटेवार, ममता बिश्वास, सरपंच गणपत मडावी, गणेश बंकावार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला ग्रीनलीफ पब्लिक स्कुलचे विद्यार्थी, महिला मंडळाच्या सर्व महिला सदस्य, अंगणवाडीच्या सेविका, मदतनीस, सखी मंचच्या सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नगरसेवक उमेश पेडुकर यांनी तर आभार विजय कारखेले यांनी मानले.यशस्वीतेसाठी स्वच्छ भारत मिशनच्या तालुका समन्वयीका सपना पुद्दटवार, राजेश गुंतीवार, नगरपंचायतीचे कर्मचारी मंगेश डोके, दिलीप रामटेके, श्रीकृष्ण तर्मलवार यांनी सहकार्य केले. यावेळी स्वच्छता पाळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
मुलचेरात स्वच्छतेवर मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 23:34 IST
खेरवडी सोशल वेलफेअर असोसिएशन मुंबई व नगरपंचायत मुलचेरा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता विषयक जाणीवजागृती मार्गदर्शन कार्यक्रम स्थानिक शहीद वीर बाबुराव सेडमाके सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आला.
मुलचेरात स्वच्छतेवर मार्गदर्शन
ठळक मुद्देनगर पंचायतीचा पुढाकार : स्वच्छता पाळण्याचे आवाहन