शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी व ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर पालकमंत्र्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:47 IST

शेतकरी कर्जमाफी, पीक कर्ज, वनहक्क पट्टे, ओबीसी आरक्षण व इतर ज्वलंत प्रश्नांना घेऊन शिवसैनिकांनी १५ आॅगस्ट रोजी स्थानिक सर्किट हाऊसमध्ये आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना घेराव घातला.

ठळक मुद्देशिवसेनेचे आंदोलन : समस्या सोडविण्याची दिली ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतकरी कर्जमाफी, पीक कर्ज, वनहक्क पट्टे, ओबीसी आरक्षण व इतर ज्वलंत प्रश्नांना घेऊन शिवसैनिकांनी १५ आॅगस्ट रोजी स्थानिक सर्किट हाऊसमध्ये आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना घेराव घातला.नागरिकांच्या मूलभूत समस्यांसंदर्भात तसेच जिल्हा विकासाच्या मुद्यावर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री आत्राम यांना जाब विचारला. यावेळी अशोक घापोेडकर, उपजिल्हा प्रमुख वासुदेव शेडमाके, नंदू कुमरे, राजू कावळे, अविनाश गेडाम, राकेश बेलसरे, सुवर्णसिंग जांगी, माजी नगराध्यक्ष डॉॅ.अश्विनी यादव, शहर प्रमुख रामकिरीत यादव, राजगोपाल सुल्लावार, प्राचार्य योेगेश गोनाडे, संतोष मारगोनवार, अशोक माडावार, नंदू चावला, सुनंदा आतला, विलास ठोंबरे, युवा सेना प्रमुख चंदू बेहरे, डॉ.बन्सोड, संजय आकरे, त्र्यंबक खरकाटे, अमित यासलवार, पप्पी पठाण, संदीप दुधबळे, रनेज मंडल, पंकज सिंह, गजानन नैताम, नूतन वेलेकर, सुषमा राऊत, शकून नंदनवार आदीसह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्री आत्राम यांना देण्यात आले. यामध्ये यादीत शेतकऱ्यांची नावे असूनही प्रत्यक्ष कर्जमाफी झाली नाही, याबाबत चौकशी करून शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्के पूर्ववत करावे, वनदाव्याचे प्रस्ताव निकाली काढून पट्टे देण्यात यावे, जिल्हा निवड मंडळ स्थापन करून बेरोजगारांना नोकरी देण्यात यावी, डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना वीज जोडणी देण्यात यावी, वनव्याप्त भागातील कुटुंबांना वनविभागामार्फत गॅस योजनेचा लाभ देण्यात यावा, आदी मागण्यांचा समावेश आहे.सदर प्रश्नांसंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन समस्या मार्गी लावू, यासाठी आपण प्राधान्याने पुढाकार घेऊ, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जOBCअन्य मागासवर्गीय जाती