शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray Uddhav Thackeray Rally Live Update : ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! महाराष्ट्रभरातून मराठीप्रेमी मुंबईत, सभास्थळी मोठी गर्दी
2
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
3
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
4
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
5
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
6
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
7
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
8
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
9
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
10
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
11
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
12
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
13
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
14
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
15
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
16
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
18
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
19
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
20
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय

ग्रामीण भागात अवैधरीत्या शिकारी वाढल्या

By admin | Updated: May 10, 2015 01:23 IST

वन्य प्राण्यांच्या शिकारीला कायदेशीर बंदी आहे.़ देसाईगंज तालुक्यातील जंगल असलेल्या परिसरात मागील काही दिवसात वन्यप्राण्यांचा शिकारी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

देसाईगंज : वन्य प्राण्यांच्या शिकारीला कायदेशीर बंदी आहे.़ देसाईगंज तालुक्यातील जंगल असलेल्या परिसरात मागील काही दिवसात वन्यप्राण्यांचा शिकारी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. वन्यप्राणी पाण्याच्या शोधार्थ गावाकडे धाव घेतात. परंतु या वन्यप्राण्यांवर कुत्रे व गावपरिसरातील शिकारीही हल्ले करतात. त्यामुळे वन्यजीव उन्हाळ्याच्या दिवसात शिकारी व कुत्र्यांच्या रडारवर असल्याचे चित्र आहे. परंतु संबंधित विभागाचे वन्यप्राण्यांच्या शिकारीकडे दुर्लक्ष असल्याचे अनेक घटनांवरून दिसून येते.तालुक्यातील कोरेगाव येथे चार महिन्यांपूर्वी एक क्विंटल रान डुकराची मटन जप्त करण्यात आली होती़ मात्र क्षुल्लक शिक्षा होऊन शिकारी मोकाट झाले़ त्यामुळे शिकाऱ्यांची हिंमत दिवसेंदिवस वाढली चालली आहे. वन्यप्राण्यांच्या शिकारीमुळे गावात मुक्कामाला असलेल्या वनरक्षकांच्या उपस्थितीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरापासून १० किमी अंतरावर जंगलपरिसर आहे. कुरखेडा मार्गावर शंकरपूर तर आरमोरी मार्गावर कोंढाळापासून जंगलाची सुरूवात होते. तालुक्याचा ७० टक्के भूभाग जंगलाने व्यापलेला आहे़ अशा निसर्गसंपन्न वनराईला शिकाऱ्यांच्या टोळ्यांनी आपले उदरनिर्वाहाचे साधन बनविले आहे़ या टोळ्यांचे मुख्य लक्ष्य जंगली रानडुक्कर, सांबर, चितळ, मोर आहेत. रात्रीच्या वेळेस शिकार करून पहाटेच्या सुमारास गावातील नियोजित ठिकाणी मांस आणून विल्हेवाट लावली जात असल्याचेही अनेक नागरिकांचे म्हणणे आहे.