शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

मशागतीची लगबग वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 23:55 IST

मृग नक्षत्र जवळ येताच शेतीच्या मशागतीच्या कामांची लगबग वाढली आहे. सकाळच्या सुमारास शेतकरी वर्ग शेतात काम करीत असल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धान, कापूस, सोयाबिन, तूर या पिकांचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते.

ठळक मुद्देतापमान घटले । कापूस व धान पिकाच्या जमिनीतील सुकलेले गवत काढण्यास सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मृग नक्षत्र जवळ येताच शेतीच्या मशागतीच्या कामांची लगबग वाढली आहे. सकाळच्या सुमारास शेतकरी वर्ग शेतात काम करीत असल्याचे दिसून येत आहे.गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धान, कापूस, सोयाबिन, तूर या पिकांचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते. पावसाला सुरूवात झाल्यानंतर पेरणीची कामे केली जातात. त्यामुळे पेरणीपूर्वी करावयाच्या कामांना सवड मिळत नाही. त्यामुळे ही कामे पाऊस पडण्यापूर्वीच आटोपून घेण्यावर शेतकऱ्यांचा भर राहतो. मृग नक्षत्राला ८ जूनपासून सुरूवात होणार आहे. सर्वसाधारणपणे मृग नक्षत्राच्या शेवटच्या कालावधीत पेरणीच्या कामांना सुरूवात होते. त्यामुळे शेतकरी आताच खरीपूर्व मशागतीच्या कामांमध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.शुक्रवारपर्यंत तापमान ४६ अंश सेल्सीअसवर पोहोचले होते. दुपारी १० वाजानंतर असह्य ऊन पडत होते. मात्र या उन्हाला न घाबरताही शेतकरी सकाळी ६ वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत शेतात काम करण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत होता.प्रामुख्याने शेतातील कचरा काढणे, ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेत नांगरणे आदी कामांना सुरूवात झाली आहे. तर काही शेतकरी घरचे शेणखत शेतात नेऊन टाकत आहेत. पूर्वी सर्व कामे बैलबंडीच्या माध्यमातून शेतकरी स्वत: करीत होते. आता मात्र ट्रॅक्टरच्या सहाय्याने बरीच कामे केली जातात. त्यामुळे ही कामे लवकर आटोपण्यास मदत होत आहे. मात्र काही कामे मनुष्यबळाशिवाय करणे शक्य नसल्याने त्यासाठी मजूर लावले जात आहेत.शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागानेही पुढाकार घेतला आहे. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कोणत्या पिकांची लागवड करावी, कोणते वाहन निवडावे, तसेच बियाणे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. 

टॅग्स :agricultureशेती