शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:36 IST

चामाेर्शी : कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा याेजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्राचार्य डाॅ. डी. जी. म्हशाखेत्री यांच्या ...

चामाेर्शी : कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा याेजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्राचार्य डाॅ. डी. जी. म्हशाखेत्री यांच्या मार्गदर्शनात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यांचे विचार आजच्या परिस्थितीत महत्त्वाचे आहे, असे मान्यवरांनी सांगितले. कार्यक्रमाला रासेयाे कार्यक्रम अधिकारी प्रा. डाॅ. राजेंद्र झाडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. वंदना थुटे, प्रा. डाॅ. भूषण आंबेकर, प्रा. संजय म्हस्के, प्रा. डाॅ. रमेश बावणे, चंद्रकांत राठाेड, रवींद्र कराडे, देवाजी धाेडरे, नीलेश कुनघाडकर, तुळशीराम जनबंधू आदी उपस्थित हाेते.

स्व. सूरजमल चव्हाण माध्यमिक आश्रमशाळा, रेखेगाव/अनंतपूर : येथे उच्च माध्यमिक शिक्षक भाऊसाहेब सहारे यांच्या अध्यक्षतेखाली राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचा कार्यक्रम युवा दिन म्हणून घेण्यात आला. याप्रसंगी शिक्षक येलेकर, वावरे आदी उपस्थित हाेते. संचालन नाकाडे यांनी केले. यशस्वीतेसाठी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

आदर्श इंग्लिश हायस्कूल, देसाईगंज : स्थानिक आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका सुलभा प्रधान, उपमुख्याध्यापक प्रा. सदाराम ठाकरे, पर्यवेक्षक जे.डी. नाकताेडे आदी उपस्थित हाेते. यावेळी माता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिराेली : राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जी.एम. तळपाडे, उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, तहसीलदार रामटेके, मनोहर बेले, वामन खडांईत आदींसह सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा परिषद, गडचिराेली : राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकांनद यांच्या जयंतीचा कार्यक्रम

उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी उमेश गायकवाड उपस्थित हाेते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात कार्यक्रम पार पाडला.

यावेळी एन.एम. कनोजिया, राजेश कंगाले, संजय राऊत, गिरीश बुद्धावार, नेताजी पुसाम, सुलोचना धारणे, अर्चना मुजुमदार, अंजली बारसागडे, नेहा लिमजे, गीता पदा, संतोष कस्तुरे, हर्षल गोंगले, सुजित दास, सारंग गायकवाड तसेच सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

गोंडवाना सैनिकी विद्यालय, गडचिराेली : स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संजीव गोसावी, पर्यवेक्षक अजय वानखेडे, संदीप कोटगले, सुनील लोखंडे उपस्थित होते. मुख्याध्यापक संजीव गोसावी यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित हाेते.

नगर परिषद, गडचिराेली : राजमाता जिजाऊंचे आदर्श सर्वांनी आत्मसात करावे तर स्वामी विवेकानंद हे युवकांचे प्रेरणास्थान असून, त्यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष याेगीता पिपरे यांनी केले. नगर परिषद कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष बोलत होत्या. सर्वप्रथम नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला, तर मुख्याधिकारी संजीव ओव्हाड यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमुख्याधिकारी रवींद्र भंडारवार, कार्यालयीन अधीक्षक मधुकर कन्नाके, स्नेहल शेंद्रे, बंडू टाकसांडे, नीलेश सोनवणे, गणेश नाईक, गणेश ठाकरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

वीर शिवाजी क्रीडा, कला, सांस्कृतिक मंडळ, घारगाव व नेहरू युवा केंद्र, गडचिराेली : घारगाव येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती वाचनालयाच्या परिसरात साजरी करण्यात आली. युवा दिनानिमित्त गावात युवकांनी स्वच्छता अभियान राबविले. अध्यक्षस्थानी पाेलीसपाटील ठेमाजी आभारे हाेते. प्रमुख अतिथी म्हणून देवराव कुकुडकर, बालाजी झोडक, नीलेश ठाकरे, पवन आभारे, मंडळाचे अध्यक्ष अमाेल मंगर, उपाध्यक्ष दीपक आभारे, सचिव आकाश झोडक उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे संचालन नितेश शेंडे, दीपक आभारे यांनी, तर आभार विशाल आभारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सागर भोयर, बाळकृष्ण धोटे, रुपेश गेडाम, शरद मंगर, खिमदेव झोडक, सूरज आभारे, तुकाराम आभारे, विश्वजित आभारे, प्रकाश धानफाेले, सौरभ आभारे, तुषार मंगर, आकाश आभारे, नीरज आभारे, नीलोज धोटे, व्यंकटेश बोरकुटे, लीलनाथ बोरकुटे, प्रवीण भगत, सुलोचना गुरफडे, सानिका आभारे, वेदांती आभारे, वैष्णवी मंगर, दीक्षा भोयर, सोनू आभारे, आकांक्षा भूरकुंडे, चेतना ठाकरे, प्राजक्ता आभारे, तनुश्री मंगर, भैरवी मंगर यांनी सहकार्य केले.