शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतचे पदाधिकारी अस्तित्वात नसतानाही ग्रामसेवकाने काढले पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2016 01:35 IST

भामरागड तालुक्यातील इरकडुम्मे ग्रामपंचायतीत सर्व पद रिक्त आहेत. सरपंच, उपसरपंचही अस्तित्वात ...

भामरागड तालुक्यातील प्रकार : चौकशीची माजी ग्रा.पं. सदस्याची मागणीगडचिरोली : भामरागड तालुक्यातील इरकडुम्मे ग्रामपंचायतीत सर्व पद रिक्त आहेत. सरपंच, उपसरपंचही अस्तित्वात नसलेल्या तारखेत ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने त्यांच्या नावे बँकेतून आर्थिक व्यवहार केल्याची बाब उघडकीस आली आहे. या संदर्भात इरकडुम्मे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मोहन इरपा कुळमेथे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे व या प्रकरणी ग्रामसेवकावर कारवाईची मागणी केली आहे. इरकडुम्मे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक २४ एप्रिल २०१५ ला लागली होती. परंतु एकही नामनिर्देशनपत्र प्राप्त न झाल्याने सर्व पद रिक्त राहिले. त्यानंतर १ नोव्हेंबर २०१५, १९ डिसेंबर २०१५ व १७ एप्रिल २०१६ ला पुन्हा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. परंतु त्यावेळी एकही नामनिर्देशन पत्र आले नाही. त्यामुळे सर्व पद रिक्त राहिले. असे असताना इरकडुम्मे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने उपसरपंच पदावर असल्याचे दाखवून त्यांच्या मार्फत तेरावा वित्त आयोग, ३०५४ जिल्हा वार्षिक योजना, २५१५ जिल्हा वार्षिक योजना, सामान्य फंड, मागास क्षेत्र अनुदान निधी, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना आदींमधून फंडाची उचल धनादेशाच्या माध्यमातून बँकांमधून केली. ही बाब उघडकीस आली आहे. या संदर्भात संबंधित ग्रामसेवकाकडून निधीचा अपहार झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मोहन इरपा कुळमेथे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. सचिव व उपसरपंच यांनी २२ जून २०१६ रोजी धनादेश क्रमांक १५७९९० खाता क्रमांक ६००५०२०५२२९ मधून एक लाख रूपये रोख रक्कम सही व शिक्क्याद्वारे काढली, अशी माहिती कुळमेथे यांनी दिली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)कसा झाला घोटाळा ग्रामपंचायतीची निवडणूक लागल्याने ग्रामपंचायतीचे सर्व पद रिक्त झाले होते. ग्रामपंचायतीचे सदस्यच अस्तित्वात नसताना उपसरपंचाची सही घेऊन ग्रामसचिवाने एक लाख रूपयांची उचल धनादेशाच्या आधारे करून शासनाची दिशाभूल केली आहे व हा निधी उचलला आहे. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा इरकडुम्मे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत घडला आहे.