शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अन्यायाविरोधात ग्रामसभा व्यापक आंदोलन छेडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 22:30 IST

तालुक्यातील जुव्वी येथे संयुक्त ग्रामसभा बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी वर्षात बांबू व तेंदू विक्री व्यवहार तसेच वनकायद्यानुसार सामूहिक वनहक्क संनियंत्रण समितीचे बँक खाते काढणे, याच खात्यातून आर्थिक व्यवहार करण्याचा ठराव घेण्यात आला. या ठरावावर चर्चाही करण्यात आली.

ठळक मुद्देजुव्वी गावात बैठक : बांबू, तेंदू विक्री, बँक खात्यांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : तालुक्यातील जुव्वी येथे संयुक्त ग्रामसभा बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी वर्षात बांबू व तेंदू विक्री व्यवहार तसेच वनकायद्यानुसार सामूहिक वनहक्क संनियंत्रण समितीचे बँक खाते काढणे, याच खात्यातून आर्थिक व्यवहार करण्याचा ठराव घेण्यात आला. या ठरावावर चर्चाही करण्यात आली. तसेच जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर अन्याय, अत्याचाराच्या विरोधात व्यापक आंदोलन छेडण्याचा ठराव या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी चुक्कू पुंगाटी होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य अ‍ॅड.लालसू नगोटी, पं.स.सभापती सुखराम मडावी, प्रेमिला कुड्यामी उपस्थित होते. सदर बैठकीत ग्रामसभांच्या आंदोलनामध्ये महिलांचा सहभाग वाढविणे, ग्रामसभांचे अध्यक्ष व सचिव पदावर महिलांना सामावून घेणे, ग्रामपंचायतस्तरावर ग्रामसभा आढावा बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा करणे, दर महिन्याला एकदा तालुकास्तरावर ग्रामसभा आढावा बैठक घेणे आदी बाबींवर चर्चा करण्यात आली. याशिवाय आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासी वने अधिकार मान्यता कायद्यात देऊ केलेल्या परिसर हक्का दाव्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.सूरजसागडसह जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या व प्रस्तावित सर्व खदानींना विरोध करणाऱ्या इतर ग्रामसभांच्या वतीने समर्थन देणे गरजेचे आहे. त्यादृष्टिकोनातून ग्रामसभेच्या पदाधिकाºयांनी पुढाकार घेतले पाहिजे, असेही उपस्थित मान्यवरांनी यावेळी सांगितले.भामरागड तालुक्यातील ज्या गावांना महसूल गाव म्हणून अद्यापही घोषित करण्यात आले नाही, अशी गावे महसुली गाव म्हणून घोषित होण्यासाठी ग्रामसभांनी पाठपुरावा करावा, असा ठराव या बैठकीत पारित करण्यात आला. विद्यमान सरकार भामरागड तालुक्यातील जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती भिषण आहे. मूलभूत समस्यांही कायम आहेत. या समस्यांना घेऊन आंदोलन करण्याची गरज असल्याचे अ‍ॅड.नोगोटी यांनी सांगितले.