शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

ग्रामसभेची परवानगी आवश्यक नाही

By admin | Updated: June 9, 2014 23:38 IST

वैरागड येथील आदिवासी जंगल कामगार संस्थेला सन २0१३-१४ या वर्षात जैतपूर कुप क्रमांक १ व २ मध्ये कुपकटाईचे काम मिळाले आहे. वनविभागाकडून जंगल कामगार संस्थेला रितसर ताबा मिळाल्यानंतर

वन विभागाचा खुलासा : कुपकटाईस मनाई न करण्याची संस्थेची मागणीवैरागड : वैरागड येथील आदिवासी जंगल कामगार संस्थेला सन २0१३-१४ या वर्षात जैतपूर कुप क्रमांक १ व २ मध्ये कुपकटाईचे काम मिळाले आहे. वनविभागाकडून जंगल कामगार संस्थेला रितसर ताबा मिळाल्यानंतर संस्थेच्या सभासदांनी कुपकटाईचे काम सुरू केले. मात्र शंकरपूर येथील ग्रामस्थांनी वनहक्क कायद्याचा आधार घेऊन कुपकटाईचे काम बंद पाडले. इमारती व जळाऊ वनोपजावर गावकर्‍यांचा हक्क राहत नाही. यामुळे कुपकटाईच्या कामासाठी ग्रामसभेची परवानगी घेणे आवश्यक नाही, असा खुलासा वडसाच्या वनपरिक्षेत्राधिकार्‍यांनी केला आहे. जंगल कामगार संस्थेच्या कुप कटाईच्या कामात अडथळा आणणे चुकीचे व नियमबाह्य आहे, असेही वनविभागाने म्हटले आहे. ग्रामस्थांनी वनहक्क कायद्याचा बाहु करून संस्थेच्या कुपकटाईच्या कामात अडथळा आणू नये, अशी मागणी जंकासचे अध्यक्ष  माजी आ. डॉ. रामकृष्ण मडावी व संस्थेच्या संचालकांनी केली आहे.वनविभागाने इमारत व जळाऊ वनउपजावर गावकर्‍यांचा हक्क राहत नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे कुप कटाईच्या कामाला अटकाव करण्याचा प्रश्नच येत नाही, असेही डॉ. रामकृष्ण  मडावी यांनी म्हटले आहे. शासन व वनविभागाचे प्रतिनिधी म्हणून जंगल कामगार संस्था काम करतात. वनविभागाने दिलेल्या आदेशानुसार नियम व अटी पाळून जंकास कार्य करतात. जी झाडे अनावश्यक आहेत, त्याबाबत वनविभागाकडून ठरवून देण्यात येऊन कुपकटाईच्या कामाला मंजुरी देण्यात येते. त्यानंतरच कुपकटाई करण्यात येते. शंकरपूर येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी जैतपूर येथे थांबविलेले कुप कटाईचे काम ही अयोग्य कृती आहे, असेही जंकासचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण मडावी यांनी म्हटले आहे. वनविभागाने या प्रकरणात हस्तक्षेप करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी वैरागड येथील जंगल कामगार संस्थेचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण मडावी, संचालक सुखदेव बोडणे, पितांबर लांजेवार, तुकाराम जुमनाके, इश्‍वर मडावी, तुळशीराम चौके, सुमन वट्टी यांनी केली आहे. वनउपजाच्या मालकीवरून वैरागड येथील जंगल कामगार संस्था व गावकर्‍यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. यामुळे कुपकटाईचे काम थांबले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)