शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भांडवलशाही विरोधात ग्रामसभा व महिला संघर्ष करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:48 IST

सावित्रीबाई फुले स्मृती दिवस व वीर बाबुराव शेडमाके जयंतीनिमित्त भामरागड पट्टी, सुरजागड पट्टी, पेरमिली इलाका समिती व सर्व ग्रामसभांच्या संयुक्त विद्यमाने भामरागड येथील लिंगोबाबा मैदानावर शनिवारी महिला अधिकार संमेलन व जाहीर सभा पार पडली.

ठळक मुद्देमार्गदर्शन : भामरागडच्या महिला अधिकार संमेलनात निर्धार

आॅनलाईन लोकमतभामरागड : सावित्रीबाई फुले स्मृती दिवस व वीर बाबुराव शेडमाके जयंतीनिमित्त भामरागड पट्टी, सुरजागड पट्टी, पेरमिली इलाका समिती व सर्व ग्रामसभांच्या संयुक्त विद्यमाने भामरागड येथील लिंगोबाबा मैदानावर शनिवारी महिला अधिकार संमेलन व जाहीर सभा पार पडली. या संमेलनात उपस्थित महिलांनी भांडवलशाही विरोधात संघर्ष मजबूत करण्याचा निर्धार केला.या संमेलनाला मध्यप्रदेश येथील जागृत दलित-आदिवासी संगठनच्या पदाधिकारी माधुरी, रेडिकल आंबेडकराईट महिला असोसिएशन महाराष्ट्राच्या संघटिका धम्मसंगिनी रमागोरख, सामाजिक कार्यकर्त्या शुभदा देशमुख, लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसाच्या समीक्षा आमटे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच मंचावर अध्यक्षस्थानी भामरागड इलाका पारंपारिक गोटूल समितीच्या सदस्य राजाश्री लेखामी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सदस्य शीला गोटा, माजी जि.प. सदस्य ग्यानकुमारी कौशी, अंगणवाडी सेविका सपना रामटेके, पं.स. उपसभापती प्रेमिला कुड्यामी, पं.स. सदस्य गोई कोडापे, भामरागड पट्टी पारंपरिक समितीचे अध्यक्ष मुन्शी धुर्वा, जि.प. सदस्य अ‍ॅड. लालसू नागोटी, पं.स. सभापती सुखराम मडावी, सरपंच बालाजी गावडे, नगरसेविका वासंती गेडाम, धुर्वे आदी उपस्थित होते.सदर महिला अधिकार संमेलन व जाहीर सभेला भामरागड, एटापल्ली, अहेरी, मुलचेरा, सिरोंचा तालुक्यातील शेकडो ग्रामसभा प्रतिनिधी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे सदर कार्यक्रमाला क्षेत्रातील महिलांचा बहुसंख्येने सहभाग होता. यावेळी मान्यवरांनी ग्रामसभांच्या अधिकार व कर्तव्याबाबत मार्गदर्शन केले.