शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

ग्राम पंचायतींचे नामांतर

By admin | Updated: May 2, 2015 01:33 IST

तालुकास्तरावरील ग्राम पंचायतीचे नगर पंचायतमध्ये रूपांतरण करण्याला मंजुरी मिळताच चामोर्शी, आरमोरी व सिरोंचा ग्राम पंचायत ..

चामोर्शी/आरमोरी/सिरोंचा : तालुकास्तरावरील ग्राम पंचायतीचे नगर पंचायतमध्ये रूपांतरण करण्याला मंजुरी मिळताच चामोर्शी, आरमोरी व सिरोंचा ग्राम पंचायत प्रशासनाने इमारतीवरील ग्राम पंचायतीच्या ऐवजी नगर पंचायत असे नामांतरण केले आहे. एक वर्षापूर्वी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यात तालुकास्तरावर नगर पंचायती स्थापन करण्यात येत होत्या. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील नगर पंचायती स्थापन करण्याबाबत शासनाने ग्राम पंचायत निवडणुकीपर्यंत ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे नगर पंचायत स्थापन होणार की नाही याबद्दल शंका, कुशंका उपस्थित केल्या जात होत्या. अशातच ग्राम पंचायत निवडणुकीच्या अगदी आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत नगर पंचायत स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे ग्राम पंचायतीच्या निवडणुका ऐन वेळेवर रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली. त्याचवेळी नगर पंचायत स्थापन झाल्याचा आनंदही नागरिकांना होत होता. नगर पंचायतीला शासन जास्तीचे अनुदान देणार असल्याने या शहरांचा विकास होण्यास फार मोठी मदत होणार आहे. २३ एप्रिल रोजी नगर पंचायतीला मंजुरी मिळाल्यानंतर ग्राम पंचायत प्रशासनाने सर्वप्रथम ग्राम पंचायतीच्या इमारतीवर लिहिलेले नाव बदलविण्याची प्रक्रिया सुरू केली. याअंतर्गत चामोर्शी, आरमोरी व सिरोंचा येथील इमारतींवर आता नगर पंचायत असे नाव लिहिण्यात आले आहे. त्याचबरोबर नगर पंचायतीची स्थापना २०१५ रोजी करण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नगर पंचायत स्थापन झाल्यानंतर ग्राम विकास अधिकाऱ्यांना हटवून तहसीलदारांना प्रशासक म्हणून नेमण्यात आले आहे. याच तहसीलदारांना महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नगर पंचायतीचे प्रथम ध्वजारोहण करण्याचा मान मिळाला. चामोर्शी नगर पंचायतीत तहसीलदार वैद्य यांनी ध्वजारोहण केले. यावेळी शहरातील नागरिक उपस्थित होते. (लोकमत न्युज नेटवर्क)