शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

नगर पंचायत की ग्राम पंचायत?

By admin | Updated: April 9, 2015 01:35 IST

जिल्ह्यात ग्राम पंचायतीच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. नाम निर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.

विलास चिलबुले आरमोरीजिल्ह्यात ग्राम पंचायतीच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. नाम निर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. मात्र आरमोरीत नगर पंचायत होणार की, ग्राम पंचायतच राहणार याबाबत येथील इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. परिणामी आरमोरी शहरात ग्रा. पं. निवडणुकीतही निरूत्साह पसरल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण ग्राम पंचायत म्हणून आरमोरी ग्राम पंचायतीचाही सहभाग आहे. तत्कालीन राज्य सरकाने प्रत्येक तालुका मुख्यालयात ग्रा. पं. ला नगर पंचायतीचा दर्जा देण्याचे घोषित केले होते. मात्र गडचिरोली हा आदिवासी जिल्हा असून येथील बारा तालुक्यांपैकी दोनच तालुका मुख्यालयात ग्राम पंचायत मोठी आहे. व इतर दहा ग्राम पंचायत कमी लोकसंख्येच्या आहेत. मागील अनेक वर्षांपासून नगर परिषदेची मागणी असलेली आरमोरी व चामोर्शी ग्राम पंचायत आहे. आरमोरी ग्राम पंचायतची निवडणूक जाहीर झाल्याने नगर परिषद की ग्राम पंचायत या संभ्रमात उमेदवार आहेत. आरमोरी ग्राम पंचायत बरखास्त होऊन नगर पंचायतीची निवडणूक होणार म्हणून मागील तीन ते चार महिन्यांपासून चर्चा सुरू होती. त्यामुळे हौशी उमेदवार नगर सेवक पदाचे बासींग बांधून होते. सरपंच पदाचेही आरक्षण जाहीर झाल्याने ही निवडणूक होणारच अशी चर्चा आरमोरीत आहे. मात्र या संदर्भात अनेक उमेदवार तहसील कार्यालयातून माहिती घेत असता, यामध्ये ग्राम पंचायत निवडणूक झाल्यानंतर काही महिन्यांतच नगर पंचायत जाहीर होऊन आरमोरी ग्राम पंचायत बरखास्त होईल, अशी माहिती त्यांना सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण येत आहे. त्यामुळे निवडणूक लढवायची कोणती? या संभ्रमात उमेदवार पडला आहे. आरमोरी ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या जि. प. व पं. स. सदस्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नोटीस जाहीर झाल्याने त्यांचे पद गोठवण्यास सुरूवात झाली आहे. मात्र या प्रोसेसिंगला सहा महिन्यांचा कालावधी लागतो. ग्राम पंचायत निवडणुका एप्रिल- मे महिन्यांतच होणार असल्याने उमेदवारांची गोची होत आहे.