शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

एप्रिलमध्ये विकलेल्या धानाला बोनस मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 17:47 IST

शासनाने ३० एप्रिलपर्यंत धान खरेदीला मुदतवाढ दिली. या कालावधीतील धान खरेदीच्या बोनसचा प्रश्न शासनाने मार्गी लावला आहे. एप्रिल महिन्यात धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना ५० क्विंटलच्या मर्यादेत प्रती क्विंटल ७०० रुपये प्रमाणे बोनस मिळणार आहे.

ठळक मुद्देमुदतवाढीनंतर ३२ हजार क्विंटल धानाची खरेदी

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोना लॉकडाऊनमुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आदिवासी विकास महामंडळांतर्गत खरीप हंगामातील आधारभूत केंद्रावरील धानाची खरेदी बंद पडली. शासनाने ३० एप्रिलपर्यंत धान खरेदीला मुदतवाढ दिली. या कालावधीतील धान खरेदीच्या बोनसचा प्रश्न शासनाने मार्गी लावला आहे. एप्रिल महिन्यात धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना ५० क्विंटलच्या मर्यादेत प्रती क्विंटल ७०० रुपये प्रमाणे बोनस मिळणार आहे.

एप्रिल महिन्यात धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबत राज्य शासनाने ४ सप्टेंबर २०२० रोजी निर्णय घेतला. त्या अनुषंगाने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने शासन निर्णय निर्गमित केला. या शासन निर्णयानुसार, खरीप हंगाम २०१९-२० मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२० या वाढीव कालावधीत खरेदी केलेल्या धानाला प्रती क्विंटल ५०० रुपये प्रोत्साहनपर व या व्यतिरिक्त २०० रुपये असे एकूण ७०० रुपयांचा बोनस मंजूर करण्यात आला आहे.आदिवासी विकास महामंडळांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाच्या हद्दित खरीप हंगामात एप्रिल महिन्यात वाढीव कालावधीमध्ये एकूण ५४ केंद्रांवरून धानाची खरेदी करण्यात आली. एकूण ४ कोटी ९८ लाख रुपये किमतीच्या २७ हजार ४३८ क्विंटल इतकी धानाची खरेदी करण्यात आली. एप्रिल महिन्यात गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या केंद्रांवर एकूण २ हजार २९० शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली. या धानाचे चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्यात आले असून बोनस अदा करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. आविका संस्थांकडून आलेल्या हुंड्यांची पडताळणी करून व संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांची तपासणी करून बोनसची रक्कम लवकरच वळती करण्यात येणार आहे, अशी माहिती महामंडळाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे शासनाने धान खरेदीला एक महिन्याची मुदतवाढ दिली होती.

दोन हजारवर शेतकºयांना मिळणार लाभशासनाने दिलेल्या मुदतवाढीनंतर एप्रिल महिन्यात आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत महामंडळाच्या वतीने आविका संस्थांमार्फत गडचिरोली व अहेरी कार्यालय मिळून जवळपास ६० केंद्रांवरून एकूण ३२ हजार ४३८ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. जवळपास अडीच हजार शेतकऱ्यांच्या धानाचा काटा एप्रिल महिन्यात करण्यात आला. ५० हजार क्विंटलच्या मर्यादेत प्रती क्विंटल ७०० रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना बोनसचा लाभ मिळणार आहे. जवळपास २ हजार शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात विक्री केलेल्या धानाला बोनस निश्चित नसल्यामुळे ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणाप्रती मोठी ओरड केली होती. मात्र शासनाने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय दिला आहे.

अहेरीत पाच हजार क्विंटलची खरेदीआदिवासी विकास महामंडळाचा धान खरेदीचा खरीप हंगाम १ ऑक्टोबर ते ३१ मार्च असा असतो. कोरोना लॉकडाऊनमुळे काही शेतकऱ्यांच्या धानाचा काटा शिल्लक होता. मुदतवाढीनंतर अहेरी कार्यालयाच्या हद्दित पाच हजार क्विंटलची धान खरेदी करण्यात आली, अशी माहिती अहेरीचे उपप्रादेशिक व्यवस्थापक आशिष मुळेवार यांनी दिली.

टॅग्स :agricultureशेती