शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावरील धान्य सडले

By admin | Updated: May 22, 2014 01:07 IST

आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने अधीनस्त असलेल्या येथील सहकारी संस्थेमार्फत दरवर्षी करोडो रूपयाचे धान्य खरेदी केले जाते.

एटापल्ली : आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने अधीनस्त असलेल्या येथील सहकारी संस्थेमार्फत दरवर्षी करोडो रूपयाचे धान्य खरेदी केले जाते. मात्र महामंडळाकडे पुरेशी गोदामाची व्यवस्था नसल्यामुळे खरेदी केलेले धान्य उघड्यावरच ठेवल्या जाते. अवकाळी पावसाचा या धान्याला फटका बसला असून या धान्यामुळे दुर्गंधी पसरून आरोग्य धोक्यात आले आहे. एटापल्ली येथे संस्थेने खरेदी केलेले धान्य उघड्यावर ठेवण्यात आले असून सदर धान्य सडले आहे.

आदिवासी विकास महामंडळाच्या अधीनस्त येथील सहकारी संस्थेने दोन वर्षापूर्वी लाखो रूपयांचे धान्य खरेदी केले. सदर धान्य उघड्यावर ठेवण्यात आले. बराच कालावधी लोटून गेल्यानंतरही उघड्यावरील धान्याची उचल करण्यात आली नाही. या धान्यावर मोकाट जनावरे व डुकरांचा नेहमी हैदोस असतो. सडलेल्या धान्याची दुर्गंधी परिसरात पसरत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिक त्रस्त झाले आहेत. उघड्यावरील सडलेल्या धान्याची आठ दिवसात उचल न केल्यास आदिवासी विकास महामंडळ प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील व्यावसायिक संघटनेने दिला आहे. या इशार्‍याची दखल घेऊन उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार यु. जी. वैद्य यांनी उघड्यावरील धान्याची पाहणी केली. सडलेले उघड्यावरील धान्य महामंडळाच्या अहेरी उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत ८ दिवसाच्या आत उचलण्याच्या सूचना उपविभागीय अधिकार्‍यांनी तहसीलदारांना दिले.

८ दिवसात धान्याची उचल न केल्यास संबंधिताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही पाटील यांनी दिले आहे. सडलेल्या धान्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार यापूर्वी उपविभागीय अधिकार्‍यांकडे देण्यात आली होती. सडलेल्या धान्याची अशाप्रकारची अवस्था बहुतांश केंद्रावर आहे. यामुळे नव्या गोदाम व्यवस्थेची मागणी नागरिकांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)