शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचे घरकूल मिळाल्याने ‘तो’ झाला कर्जबाजारी

By admin | Updated: December 4, 2014 23:08 IST

एक छोटे घरकूल असावे छान, अशी सर्वांची अपेक्षा असते. श्रीमंत माणसापासून ते गरीब माणसापर्यंत सर्वचजण हे स्वप्न उराशी घेऊन आपली जीवनभर धावपळ चालू ठेवतात व घरकूल होण्याचा क्षण जवळ आला की,

संजय गज्जलवार - जिमलगट्टाएक छोटे घरकूल असावे छान, अशी सर्वांची अपेक्षा असते. श्रीमंत माणसापासून ते गरीब माणसापर्यंत सर्वचजण हे स्वप्न उराशी घेऊन आपली जीवनभर धावपळ चालू ठेवतात व घरकूल होण्याचा क्षण जवळ आला की, आनंदाला पारावार उरत नाही, अशी सर्वांचीच स्थिती होते. हे घरकूल पूर्ण करण्यासाठी मिळेल तेथून पैसा जमा करून ते साकारण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र कधीकधी हे घरकूल शासनाकडूनही मंजूर झाले म्हणजे, फार काही आर्थिक बोझा उरावर येत नाही, ही अपेक्षा असते व आपल्याला सहजतेने घर मिळाले या आनंदाने अनेकांना पारावरही उरत नाही. मात्र सरकारच्या घरकुलाने कर्जबाजारी होऊन आता लोकांसमोर हात पसरविण्याची वेळ यावी अशी स्थिती अहेरी तालुक्याच्या पत्तीगाव गावात एका लाभार्थ्यावर आली आहे. घरकूलासाठी जवळ जमा असलेले पैसे लावून दिल्यानंतरही शासनाचे अनुदान मागील दोन वर्षांपासून आलेले नाही. त्यामुळे कर्जबाजारीत स्थिती कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे आता या लाभार्थ्याला कठीण होऊन गेले आहे. जिमलगट्टा हे अहेरी तालुक्यातील मोठे गाव. जिमलगट्टापासून १० किमी अंतरावर पत्तीगाव आहे. येथील अडमा सांबा गावडे या लाभार्थ्याला सन २०१२ मध्ये घरकूल मंजूर झाले. अडमा यांनी शासनाकडून घरकूल मंजूर झाले म्हणून बांधकामाला जोमाने सुरूवात केली. संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. शासनाकडून बांधकामासाठीचा पहिला हप्ताही मिळाला व त्यांनी परत बांधकामाला वेगाने सुरूवात केली. गतवर्षीपर्यंत त्यांनी दरवाजाच्यास्तरापर्यंत म्हणजे ७ फूटापर्यंत बांधकाम पूर्ण केले. सदर बांधकाम करण्यासाठी त्यांनी सिमेंट, सळाखी व इतर साहित्य हे उधारीत नजीकच्या दुकानदाराकडून आणले. आपल्या घरकुलाचे दुसऱ्या टप्प्यातले बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी ग्रामसेवकांना तसेच पंचायत समितीलाही स्वत: जाऊन दिली. मात्र दुसऱ्या टप्प्यातील बांधकामाचे पैसे मागील दोन वर्षांपासून त्यांना मिळालेले नाही. ग्रामसेवकाकडेही त्यांनी यासंदर्भात तक्रार केली. परंतु अजून त्यांचे बिलच टाकण्यात आलेले नाही, अशी माहिती मिळाली आहे. स्वत: कर्जबाजारी होऊन हे घरकूल उभे करताना त्यांनी पोटाला मोठी पिळ दिली. परंतु शासनाकडून अनुदान आले नाही. अखेरीच त्यांना पुढचे काम थांबवावे लागले. आता कुटुंब कसे चालवायचे, अर्धवट बांधकाम झालेल्या घरात राहायचे कसे असे अनेक प्रश्न त्यांच्या कुटुंबासमोर निर्माण झाले आहे व अडमा आता द्विधा मनस्थितीत पोहोचले असून शासनाच्या घरकुलाने आपल्याला कर्जबाजारी केले, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.