शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

श्रमिकांची एकजूट तोडण्याचे सरकारचे डावपेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:09 IST

कर्मचाऱ्यांच्या बाबतीत या सरकारचे धोरण उदारपणाचे नाही. श्रमिकांची एकजूट तोडण्याचे डावपेच सरकार आखत आहे. विविधतेतील एकता कायम टिकविण्यासोबतच कर्मचाºयांचे हित जोपासण्यासाठी....

ठळक मुद्देजि.प.महासंघाचा आरोप : त्रैमासिक सभेत ठरविली कर्मचाºयांच्या पुढील आंदोलनाची दिशा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कर्मचाऱ्यांच्या बाबतीत या सरकारचे धोरण उदारपणाचे नाही. श्रमिकांची एकजूट तोडण्याचे डावपेच सरकार आखत आहे. विविधतेतील एकता कायम टिकविण्यासोबतच कर्मचाºयांचे हित जोपासण्यासाठी महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ टप्प्याटप्प्याने आंदोलन करणार आहे, अशी माहिती महासंघाचे राज्य सरचिटणीस अशोक थूल व इतर पदाधिकाºयांनी दिली.राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या २१ संघटनांचे प्रतिनिधीत्व करणाºया जि.प. कर्मचारी महासंघाची राज्यस्तरिय त्रैमासिक सभा शनिवारी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडली. या सभेला २२ जिल्ह्यातील १४ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सभेनंतर झालेल्या पत्रपरिषदेत थूल यांच्यासह महासंघाचे राज्य अध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, उपाध्यक्ष नंदकिशोर ठाकूर, राज्य ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ ढाकणे, परिचर संघटनेच्या वंदना मेश्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी सदर पदाधिकाºयांनी सांगितले, १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या कर्मचाºयांना पेन्शन नाकारली जात आहे. त्यात कर्मचाºयांच्या पगारातून १० टक्के रक्कम कपात केली जात आहे. सरकारने पीएफचा बदलविलेला कायदा रद्द करून कर्मचाºयांच्या पगारातून कपात केलेली १० टक्के रक्कम त्यांच्या भविष्य निर्वाह निधीत स्थानांतरित करावी. सध्या ४० टक्के कर्मचारी कंत्राटी आहेत. त्यांनी संघटित होऊ नये म्हणून दहशत निर्माण केली जात आहे. त्यांच्या हक्कावर ही गदा असून त्यांच्या पेन्शनसाठी, राज्यात सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी टप्प्याटप्प्याने संघर्ष केला जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.परिचरांना १२०० रु. पगारआरोग्य विभागाच्या अखत्यारित काम करणाऱ्या परिचरांना २०१० पासून अवघा १२०० रुपये पगार दिला जातो. नागपूर हायकोर्टाने त्यांना १० हजार रुपये मासिक पगार व वर्ग ४ चा दर्जा देण्याचे निर्देश दिले. पण त्याविरूद्ध सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपिल केले. हे सरकार केवळ उद्योगपतींचे हित जोपासत असल्याचा आरोपही त्यांनी केला.