शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नाही

By admin | Updated: September 16, 2015 01:58 IST

केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड गळचेपी होत आहे. गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती.....

रायुकाँचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा : सलील देशमुख यांचा घणाघाती आरोपगडचिरोली : केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड गळचेपी होत आहे. गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असताना कुठेही शेत जमिनीचे सर्वेक्षण होताना दिसून येत नाही. शेतकऱ्याच्या शेत मालाला योग्य भाव नाही. अतिवृष्टीबाबत शासनाकडून आर्थिक मदत नाही, तसेच चर्चाही नाही, एकूणच सरकारच्या वाटचालीवरून भाजप प्रणीत सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मुळीच गंभीर नाही, असा घणाघाती आरोप रायुकाँचे प्रदेश उपाध्यक्ष व विदर्भ प्रभारी सलील देशमुख यांनी केला.राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा गडचिरोलीच्या वतीने मंगळवारी पक्षाच्या कार्यालयात रायुकाँचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून देशमुख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राकाँचे जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून आशिष नाईक, जि. प. अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, राकाँचे कार्याध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, हेमंत जंबेवार, युनुस शेख, अजय कुंभारे, श्रीनिवास गोडसेलवार, रिंकू पापडकर, नितीन खोबरागडे, युकाँचे सिरोंचा तालुकाध्यक्ष सतिश भोगे आदी उपस्थित होते. खोटे आश्वासन देऊन भाजपच्या नेत्यांनी केंद्र व राज्यात सत्ता मिळवली. सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक झाली, हे आता नागरिकांच्या लक्षात येत आहे. राकाँच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात भाजप सरकारच्या विरोधात जनजागृती करावी, तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर जनआंदोलन छेडावे, तसेच पक्ष संघटन मजबूत करावे, असे आवाहन सलील देशमुख यांनी यावेळी केले. याप्रसंगी सुरेश पोरेड्डीवार, भाग्यश्री आत्राम यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक श्रीनिवास गोडसेलवार, संचालन रिंकू पापडकर यांनी केले तर आभार अजय कुंभारे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)