लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विद्यमान शासनाने जातीयवाद वाढवून देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ही बाब येथील जनतेच्या लक्षात आली आहे. त्यामुळे देशात व राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे. अशी प्रतिक्रिया भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केली.गडचिरोली येथे बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला चंद्रकांत हंडोरे गडचिरोलीत आले असता पत्रकारांशी वार्तालाप करीत होते. २०१४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने अवास्तविक आश्वासने दिली. ही आश्वासने पूर्ण करणे मोदी सरकारला शक्य झाला नाही. सत्तेसाठी शासनाने जनतेची फसवणूक केली आहे. ही बाब आता जनतेच्या लक्षात यायला लागली आहे. याचा परिणाम छत्तीसगड, राजस्थान व मध्यप्रदेशातील निवडणुकीत दिसून आला आहे. याचाच प्रत्यय येत्या लोकसभा निवडणूकीत येणार आहे. विद्यमान शासनाने जातीजातींमध्ये तेढ निर्माण करून देशातील शांतता धोक्यात आणली आहे. राज्यघटना बदलविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी शासनाने निश्चीत आराखडा तयार करावा. भीमशक्ती संघटना सामाजिक संघटना असून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच अन्याय, अत्याचारविरोधात लढत आहे. अशी माहिती दिली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर, भीमशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अॅड. यशवंत मेश्राम, जिल्हाध्यक्ष कैवरदास रायपुरे, नामदेव पिंपळे, पंकज मेश्राम, अविनाश भगत, विजय मेश्राम, राजेश देशभ्रतार, श्याम खंडारे, विनय बांबोळे, प्रकाश देशपांडे आदी उपस्थित होते.
शासनामुळे देशात अशांततेचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 23:53 IST
विद्यमान शासनाने जातीयवाद वाढवून देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ही बाब येथील जनतेच्या लक्षात आली आहे. त्यामुळे देशात व राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे. अशी प्रतिक्रिया भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केली.
शासनामुळे देशात अशांततेचे वातावरण
ठळक मुद्देचंद्रकांत हंडोरे यांची प्रतिक्रिया : भाजपप्रणीत सरकारने जनतेची दिशाभूल केली