शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय स्वस्त धान्य दुकान झाले हायटेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2017 01:07 IST

शासनातर्फे स्वस्त दरात रेशन कार्डधारकांना अन्नधान्याचा पुरवठा दर महिन्याला करण्यात येतो.

वितरण प्रणाली होणार पारदर्शक : कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्नसिराज पठाण   कुरखेडाशासनातर्फे स्वस्त दरात रेशन कार्डधारकांना अन्नधान्याचा पुरवठा दर महिन्याला करण्यात येतो. या वितरण व्यवस्थेत अनेकदा मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याच्या तक्रारी होत होत्या. यापुढे वितरण व्यवस्थेत पारदर्शकता निर्माण व्हावी व खऱ्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ व्हावा, यासाठी तालुक्यातील प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात पीओएस मशीनचा पुरवठा करण्यात आला आहे.सदर मशीनमध्ये आधार लिंक करण्यात आलेल्या राशनकार्ड धारक किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याचा अंगठ्याचा ठसा मॅच झाल्यावरच त्याला योजनेचे धान्य पुरवठा केले जाणार आहे. त्यामुळे वितरण व्यवस्थेत पारदर्शकता निर्माण होऊन खऱ्या लाभार्थ्यालाच धान्य मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.शासकीय स्वस्त धान्य वितरण योजनेंतर्गत अंत्योदय, बीपीएल, एपीएल रेशनकार्ड धारकांना शासनातर्फे दर महिन्याला अत्यल्प दरात धान्याचा पुरवठा करण्यात येते. मात्र शासनाच्या या पुरवठा योजनेचा साखळीतील काही घटक पूर्ण लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचू देत नाही. ग्रामीण, दुर्गम भागात पुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत लाभार्थ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात येत असल्याची तक्रारी वारंवार शासनाकडे होत होत्या. या भ्रष्ट प्रवृत्ती आळा घालण्यासाठी योजनेत पारदर्शकता निर्माण करण्याच्या उद्देशाने अत्याधुनिक प्रणालीचा अंतरभाव करण्यात आला. कुरखेडा तालुक्यातील सर्व ९८ स्वस्त धान्य दुकानात पीओएस मशीनचा पुरवठा केलेला आहे. सदर मशीन थेट अन्नपुरवठा अधिकाऱ्यांशी जोडण्यात आलेली आहे. शासनाला एक क्लिकवर संबंधित दुकानाची वितरणाची पूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. मशीनमुळे खऱ्या लाभार्थ्यांना ओळखणे सुलभ होणार असून पीओएस मशीनने लाभार्थ्यांना धान्याचा रोख स्वरूपातील खरेदीचा व्यवहार कार्ड क्रॅश करून बँक खात्यातून करता येणार आहे. त्यामुळे कॅशलेस व्यवहारालाही प्रोत्साहन ग्रामीण भागातून मिळण्यास मदत होणार आहे.