शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

समस्याग्रस्त आहे गोंडवाना विद्यापीठ

By admin | Updated: November 23, 2014 23:20 IST

२००९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी गडचिरोली येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

गडचिरोली : २००९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी गडचिरोली येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. २०११ मध्ये हे विद्यापीठ स्थापन होऊन विद्यापीठाचा कारभार सुरू झाला. सदर विद्यापीठ निर्मितीच्या कामात राज्याचे सध्याचे अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा पुढाकार घेतला होता. मात्र विद्यापीठ निर्माण झाल्यानंतर येथील कारभारामुळे त्यांनी या विद्यापीठाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. अद्याप विद्यापीठाला स्वत:ची जमीन मिळालेली नाही. विद्यापीठाच्या कारभाराला स्थैर्य देणे व जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी विद्यापीठाच्या अडचणी सोडविण्यात शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. याला लोकप्रतिनिधीही तेवढेच जबाबदार आहेत.मागील दीड ते दोन वर्षांपासून विद्यापीठांच्या समित्या गठण करण्याचे काम रखडलेले आहे. याशिवाय मागील दोन ते अडीच वर्षांपासून गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाला जागा उपलब्ध झालेली नाही. गोंडवाना विद्यापीठ स्थापन झाले. मात्र राज्य सरकारने अद्याप विद्वत्त व व्यवस्थापन या दोन प्रमुख समित्यांसह अन्य समित्यांचेही गठण केलेले नाही. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाचा शैक्षणिक डोलारा पूर्णत: कोसळलेला आहे. गोंडवाना विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू नियुक्त करण्यासाठीही अडचणी निर्माण झाल्या आहेत. गोंडवाना विद्यापीठ २ एफमध्ये नसल्यामुळे या विद्यापीठातील अनेक महाविद्यालयांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून १२ (बी) अनुदानासाठी मान्यता दिली जात नाही. १२ बी अनुदानासाठी गोंडवाना विद्यापीठात किमान पाच स्वतंत्र पदव्युत्तर विभाग व या विभागात प्राध्यापकांची नियुक्ती होणे आवश्यक आहे. मात्र स्वतंत्र विभाग नसल्याने याचा फटका इतर महाविद्यालयांना बसत आहे. त्यामुळे राज्य शासनाने गोंडवाना विद्यापीठात तत्काळ स्वतंत्र ५ पदव्युत्तर विभागाची नियुक्ती करावी. गोंडवाना विद्यापीठाने १२ बी अनुदानाचा प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाकडे दाखल केला आहे. मात्र सदर प्रस्ताव अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या विद्यापीठांतर्गत ३० महाविद्यालयांना २ एफ १२ बी चे अनुदान आहे. मात्र विद्यापीठांतर्गत ३४ महाविद्यालय या अनुदानापासून वंचित आहेत. विद्यापीठ विभाजनाचा अनेक महाविद्यालयांना फटका बसला. गोंडवाना विद्यापीठांतर्गत चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात २२७ महाविद्यालय आहेत. यापैकी अनेक महाविद्यालयांना पूर्णवेळ व पीएचडी पात्रताधारक प्राचार्य नाहीत. त्यामुळे या महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवरही परिणाम होत आहे. अनेक महाविद्यालयांना आता विद्यार्थ्यांचीही टंचाई जाणवू लागली आहे. या विद्यापीठाला राष्ट्रीय पातळीवर चांगला दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे. यासाठी राज्य सरकारचे सहकार्य आवश्यक आहे.