शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

‘गोंडवाना’च्या समित्या बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:14 IST

चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यासाठी २ आॅक्टोबर २०११ रोजी स्थापन झालेल्या गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात शासनाच्या परिपत्रकानुसार गठित करण्यात आलेल्या विद्यापीठ अधिसभा,...

ठळक मुद्देपदवीधरांची प्राथमिक यादी जाहीर : विद्यापीठ प्रशासनाच्या हालचाली वाढल्या

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यासाठी २ आॅक्टोबर २०११ रोजी स्थापन झालेल्या गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात शासनाच्या परिपत्रकानुसार गठित करण्यात आलेल्या विद्यापीठ अधिसभा, विद्वत, व्यवस्थापन व अभ्यास मंडळांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे या समित्या ३१ आॅगस्ट २०१७ रोजी बरखास्त करण्यात आल्या आहे. निवडणुकीची अधिसूचना निर्गमित झाल्यानंतर सदर समित्या नव्याने गठित करण्यासाठी कार्यवाहीस सुरुवात होणार आहे.गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात एकूण २३८ महाविद्यालये आहेत. त्यापैकी विनाअनुदान तत्त्वावर असलेल्या ३० महाविद्यालयांची मान्यता विद्यापीठ प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच काढल्याने हे महाविद्यालय बंद झाले आहेत. विद्यापीठाअंतर्गत विविध अभ्यासक्रम चालविले जात असून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यापीठाच्या कार्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे, तसेच शिक्षणाची प्रक्रिया सुलभ व्हावी या हेतूने विद्यापीठस्तरावर अधिसभा, विद्वत आणि व्यवस्थापन परिषद आदी समित्या गठित केल्या जातात. याशिवाय विविध अभ्यासक्रमांचे मंडळही गठित केले जाते. विद्यापीठाच्या स्थापनेनंतर ११२ बी अंतर्गत शासनाने अडीच वर्षाकरिता या समित्या गठित केल्या होत्या. मात्र आता या समित्यांचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे ३१ आॅगस्ट २०१७ या समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत.कुलगुरूंकडून विद्वत परिषदेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून विद्यापीठस्तरावरील एक व महाविद्यालयस्तरावरील एक अशा दोन प्राध्यापकांची निवड करण्यात येणार आहे. तसेच निवडणुकीसाठी विद्यापीठ प्रशासनाने पदवीधरांची प्राथमिक मतदार यादी जाहीर केली आहे. याकरिता आरक्षणही जाहीर करण्यात आले आहे. यात १६ हजार ४६२ मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.विद्यापीठाच्या सर्व समित्यांची निवडणुकीची अधिसूचना येत्या आठ दिवसात जाहीर होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर ४५ ते ४९ दिवसांत ही सर्व निवड प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे, अशी माहिती गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव दीपक जुनघरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. विद्यापीठाच्या समित्यांवर वर्णी लावण्यासाठी काही प्राध्यापकांनी धडपड सुरू केली आहे.‘तो’ निर्णय शासनस्तरावर होईलचंद्रपूर व गडचिरोली हे दोन्ही जिल्हे मिळून एकूण २३८ महाविद्यालये गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित आहेत. त्यापैकी ३० महाविद्यालये विद्यापीठ प्रशासनाने अलिकडेच बंद केली आहेत. या महाविद्यालयातील मान्यताप्राप्त प्राध्यापकांचे नाव मतदार म्हणून यादीत असेल तर ते आता होणाºया विविध समित्यांच्या निवडणुकीसाठी पात्र होणार की नाही, याबाबतचा निर्णय शासन घेणार आहे. यासंदर्भात गोंडवाना विद्यापीठाने राज्यपाल व संचालक, उच्च व तंत्रशिक्षण महाराष्टÑ शासन यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. बंद केलेल्या ३० महाविद्यालयातील प्राध्यापकांबाबतचा निर्णय शासनस्तरावरूनच होणार आहे.