शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंजात सोन्याचा भाव ५० हजारांवर

By admin | Updated: November 11, 2016 01:20 IST

५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय ८ नोव्हेंबर रोजी केंद्र शासनाने घेतल्यानंतर देसाईगंज शहरातील काळा पैसाधारकांचे धाबे दणाणले आहेत.

५०० व १००० च्या नोटा बंद झाल्याचा परिणाम : काळा पैसावाल्यांची दुकानात गर्दी वाढलीदेसाईगंज : ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय ८ नोव्हेंबर रोजी केंद्र शासनाने घेतल्यानंतर देसाईगंज शहरातील काळा पैसाधारकांचे धाबे दणाणले आहेत. या पैशाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने त्यांचा मोर्चा आता सोन्याच्या दुकानांकडे वळला आहे. याच संधीचा फायदा उचलत सराफा व्यापाऱ्यांनीही सोन्याचे भाव गगणाला भिडविले आहेत. बुधवारपासून देसाईगंज शहरातील काही सोने चांदीचे दुकानदार या काळ्या पैसेवाल्यांना तब्बल ५० हजार रूपये तोळ्याने सोन्याची विक्री करीत आहेत. देसाईगंज हे गडचिरोली जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असलेले व काही प्रमाणात औद्योगीकरण झालेले शहर आहे. या शहरात लहान, मोठे शेकडो व्यापारी आहेत. देसाईगंज येथील कपडा, बाजार संपूर्ण जिल्ह्यात प्रसिध्द आहे. त्याचबरोबर इतरही वस्तू ठोक भावाने स्वस्त मिळत असल्याने जिल्ह्यातील अनेक ग्राहक देसाईगंज येथूनच माल खरेदीस पसंती दर्शवितात. देसाईगंज शहरात विविध मालाचे शेकडो ठोक विक्रेते आहेत. सदर व्यापाऱ्यांनी शासनाचा कर चुकवित कोट्यवधी रूपयांचा काळा पैसा जमा करून ठेवला आहे. मात्र पंतप्रधानांनी ५०० व १००० रूपयांच्या नोटा बंद केल्यानंतर काळा पैसा बाळगणारे व्यापारी अडचणीत आले आहेत. काळा पैसा बाळगणाऱ्यांनी आपला मोर्चा सोना, चांदीच्या दुकानाकडे वळविल्यानंतर सोने, चांदी दुकानदारांनी १० ग्रॅम सोन्याची किमत ५० हजार रूपये आकारण्यास सुरूवात केली. या ५० हजार रूपयांच्या भावाने देसाईगंज शहरात एकाच दिवसात तीन किलो सोना विकला असल्याची चर्चा आहे. काळ्या पैशाला नियमित करण्यासाठी व्यापाऱ्यांनी विविध शक्कल लढविण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच हा एक भाग आहे. ५० हजार रूपये दराने सोने खरेदी करताना मात्र खरेदीचा बिल मागील तारखेचा देण्याची अट व्यापाऱ्यांनी घातली आहे. जुन्या तारखेचा बिल देण्यास सोने, चांदी व्यावसायिक तयारही झाले आहेत. त्यामुळे काळ्या पैशाला पांढरा करण्यात सोने, चांदी व्यावसायिकांचाही हात आहे. आयकर विभागाने सोने, चांदी व्यापाऱ्यांवरही कडक नजर ठेवण्याची मागणी केली जात आहे. (वार्ताहर)