शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामकोषांचे आर्थिक व्यवहार गुलदस्त्यात

By admin | Updated: March 17, 2017 01:11 IST

पेसा कायद्यांतर्गत जिल्ह्यातील ग्रामसभांना तेंदूपत्ता संकलन, बांबू तोडून विक्रीचे अधिकार तसेच पाच टक्के पेसा निधी दिला जातो.

तेंदू व बांबूचा निधी : दोन वर्षांपासून आॅडिट रखडले दिगंबर जवादे   गडचिरोली पेसा कायद्यांतर्गत जिल्ह्यातील ग्रामसभांना तेंदूपत्ता संकलन, बांबू तोडून विक्रीचे अधिकार तसेच पाच टक्के पेसा निधी दिला जातो. हा सर्व निधी ग्रामकोषात जमा केला जातो. सदर निधी खर्च करण्याचे व खर्चाचे नियोजन करण्याचे अधिकार ग्रामसभेला देण्यात आले आहेत. मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील ग्रामसभांनी शेकडो कोटी रूपयांची उलाढाल केली आहे. मात्र या पैशाचे आॅडिटच झाले नसल्याने नेमका कशावर पैसा खर्च झाला. त्याचा विनियोग योग्य झाला आहे की नाही या सर्व बाबी गुलदस्त्यात आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील एकूण गावांपैकी सुमारे १ हजार ३१३ गावे पेसांतर्गत मोडतात. या गावांचा जंगलाच्या संरक्षणात मोठा हातभार असल्याने गावाच्या सीमेतील जंगलातून वनोपज गोळा करण्याचे अधिकार संबंधित गावांना केंद्राच्या पेसा कायद्यांतर्गत देण्यात आले आहेत. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील पेसा अंतर्गतच्या ग्रामसभा तेंदू संकलन, बांबूची खरेदी विक्री करीत आहेत. मागील वर्षी जवळपास ३०० ग्रामसभांनी तेंदूपत्ता संकलन स्वत:च केले होते. तेंदूपत्ता संकलनाच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांचा निधी ग्रामकोषामध्ये जमा झाला होता. सदर निधी शासकीय असल्याने या निधीचा विनियोग शासनाच्या नियमाप्रमाणेच होणे आवश्यक आहे. त्यामुळे सदर निधीचे दरवर्षी लेखा विभागाच्या वतीने आॅडिट होणे अत्यंत गरजेचे आहे. ग्रामकोषामध्ये निधी जमा होऊन दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत आला आहे; तथापि अजूनपर्यंत एकाही ग्रामकोषांचे आॅडिट झाले नाही. त्यामुळे नेमका कोणत्या बाबीवर कोट्यवधी रूपये खर्च झाले आहेत. याचा पत्ता लागणे जवळपास अशक्य झाले आहे. ग्रामपंचायतीचे आॅडीट ज्यावेळी होते. त्याचवेळी ग्रामसभेचेही आॅडीट करणे शक्य होते. पण त्यासाठी ग्रामसभेचे पत्र आवश्यक आहे. ग्रामसभांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये याबाबत फारशी माहिती नसल्याने ते आॅडिट करण्यासाठी पत्र देत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे दोन वर्षांचा कालावधी होऊनही अंकेक्षणाचे काम पूर्णपणे रखडले आहे. आजपर्यंत एकाही ग्रामकोषाचे आॅडिट झाले नसल्याची गंभीर बाब असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली जात आहे. गावातील ‘मुखिया’चा दबाव गावाच्या विकासाला चालना मिळावी, यासाठी शासनाने तेंदू व बांबूच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीवर पाणी फेरले आहे. बांबू व तेंदूच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या निधीचा विनियोग करण्याचे पूर्ण अधिकार ग्रामसभेला देण्यात आले आहेत. मात्र दुर्गम भागातील बहुतांश गावकऱ्यांना ग्रामसभेचे महत्त्व कळत नाही. त्यामुळे ते ग्रामसभेत येत नाही. ग्रामसभेच्या नावावर गावातील मुखिया व दोन-चार व्यक्ती पूर्ण निर्णय घेऊन निधीचा विनियोग करतात. यामध्ये बहुतांशवेळा गैरप्रकार झाल्याच्याही बाबी उघडकीस आल्या आहेत.या सर्व बाबींचे अधिकृत आॅडीट झाले नसल्याने त्या आर्थिक व्यवहारांवर ठळकपणे ठपका ठेवणे कठीण झाले आहे. ग्रामकोषातील पैशावर केवळ आपलाच अधिकार आहे. अशा अविर्भावात ग्रामसभेचे पदाधिकारी वागत असल्याचे दिसून येत आहे. १ हजार ४४ गावे करणार तेंदू संकलन चालू वर्षी जिल्हाभरातील १ हजार ४४ गावे तेंदूपत्ता संकलन स्वत: करणार आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या ग्रामसभांची संख्या चार पटीने वाढली आहे. त्याचबरोबर तेंदूलाही चांगला भाव मिळाला असल्याने यावर्षी शेकडो कोटी रूपयांची उलाढाल तेंदूच्या माध्यमातून होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.