शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

गटसाधन केंद्र पुस्तकांनी भरले तालुक्याला

By admin | Updated: May 23, 2014 23:53 IST

राज्याच्या शालेय शिक्षण विभागामार्फत शिक्षणाच्या अधिकार अधिनियमानुसार इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात.

पुस्तक पोहोचली : मुख्याध्यापक, शिक्षकांची लगबग सुरू

गडचिरोली : राज्याच्या शालेय शिक्षण विभागामार्फत शिक्षणाच्या अधिकार अधिनियमानुसार इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात. जि.प. च्या शिक्षण विभागाने योग्य नियोजन केल्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसात बाराही तालुक्याच्या ठिकाणी पाठ्यपुस्तके पोहोचली आहे. ही पाठ्यपुस्तके शाळांवर नेण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांची लगबग सुरू झाली आहे. दरवर्षी जिल्ह्यातील अहेरी, भामरागड, सिरोंचा, कोरची या दुर्गम तालुक्यात वेळेवर पाठ्यपुस्तके पोहोचत नव्हती. मात्र यावर्षी योग्य नियोजन करण्यात आल्यामुळे सर्वप्रथम या चार दुर्गम तालुक्याच्या ठिकाणी पाठ्यपुस्तके पोहोचविण्यात आली आहेत. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात चार तालुके व तिसर्‍या टप्प्यात उर्वरित चार तालुके अशा बाराही तालुक्यात पाठ्यपुस्तके पोहोचली आहेत. गडचिरोली येथील गटसाधन केंद्रात इयत्ता पहिली ते आठवीच्या अभ्यासक्रमाचे मराठी, हिंदी, सेमी इंग्लीश व इंग्लीश या चार माध्यमांची पाठ्यपुस्तके पोहोचली आहे. १३ लाख ५ हजार १९७ पाठ्यपुस्तके ठेवण्यात आल्याने गटसाधन केंद्र पुस्तकांनी गच्च भरले आहे. गडचिरोली पंचायत समितीमधील मुरखळा, काटली, येवली या तीन केंद्रातील शाळांवर पाठ्यपुस्तके पोहोचविण्याची कार्यवाही सुरू असल्याचे गटसाधन केंद्राच्या समन्वयकांनी सांगितले आहे. तालुक्यातील शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षक गटसाधन केंद्रात येऊन वाहनाने आपल्या शाळेत पुस्तके नेत आहेत. २ ते ३ दिवसात ताुलक्यातील ९ केंद्रातील सर्व शाळांवर पुस्तके पोहोचणार आहेत. आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, अहेरी आदीसह १२ तालुक्याच्या ठिकाणी पुस्तके पोहोचली आहे. सदर पुस्तके २ हजार ४८ शाळांमधील एकूण १ लाख ३६ हजार ४८२ विद्यार्थ्यांच्या हातात पडणार आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)