शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा परीक्षेतून प्रशासकीय सेवेत जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2017 02:09 IST

खेडुले कुणबी समाजातील युवक-युवतींनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवेमध्ये यश मिळावावे,

वनमाला नाकतोडे यांचे आवाहन : आरमोरी खेडुले कुणबी समाजाचा मेळावा आरमोरी : खेडुले कुणबी समाजातील युवक-युवतींनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवेमध्ये यश मिळावावे, असे प्रतिपादन सहायक पोलीस निरीक्षक वनमाला नाकतोडे यांनी केले. खेडुले कुणबी समाजाच्या वतीने आरमोरी येथे दामोधर मंगल कार्यालयामध्ये वधू- वर परिचय मेळावा, गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार आणिक महिलांच्या हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. मेळाव्याचे उद्घाटन खेडुले कुणबी समाज चंद्रपूरचे अध्यक्ष पुरूषोत्तम सहारे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. हितेंद्र धोटे, प्रा. काशिनाथ मातेरे, प्रा. प्रकाश बगमारे, शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष धनपाल मिसार, माजी शिक्षण विस्तार अधिकारी विठ्ठलराव देशमुख, ऋषी लांडे, सरपंचा मनीषा दोनाडकर, भीवाजी नाकतोडे, गोपीनाथ नखाते, मनोहर सुंदरकर आदी मान्यवर उपस्थित होते. मार्गदर्शन करताना नाकतोडे म्हणाले की, सामान्य परिस्थितीतून समोर जावून विद्यार्थ्यांनी पदवी संपादन केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत उतरावे. या परीक्षेचा नियोजनबद्ध अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविणे कठिण नाही, असेही नाकतोडे म्हणाल्या. मान्यवरांच्या हस्ते हरिओम अण्णा ठाकरे, सौरभ भावे, अंजली चौधरी या दहावीतील विद्यार्थ्याचा तसेच बारावीतील केतकी पिलारे, अभिनव कुथे, जयंत भावे यांचा सत्कार करण्यात आला. वाणिज्य शाखेतील प्रशांत दर्वे, अनिल कार यांना सन्मानित करण्यात आले. अभियंता परीक्षा पास झालेले जयश्री धोटे, हिचा सत्कार करण्यात आला. निशिकांत बुल्ले याने नेट परीक्षा उत्तीर्ण केल्याने त्याचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरविण्यात आलेले चंद्रशेखर प्रधान यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. रामहरी राऊत, संचालन जयंत राऊत तर आभार दौलत धोटे यांनी मानले. यशस्वीतेसाठी खरकाटे, परमेश्वर भावे, नंदू नाकतोडे, किशोर ठाकरे, भाऊराव तलमले, मेघराज बुराडे, शालिकराम राऊत, दौलत कुथे, मंजूषा दोनाडकर, पुष्पा दिवटे, कविता दोनाडकर, बाळकृष्ण ढोरे, सदाशिव धोटे, मधुकर दोनाडकर व समाजबांधवांनी सहकार्य केले. सदर मेळाव्याला गडचिरोली जिल्हाभरातून खेडुले कुणबी बांधव उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)