शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी तिरावर टाकणार भराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:16 IST

तेलंगणा सरकारच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या कालेश्वरम सिंचन प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील आईपेठा व तुमनूर ही गावे बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. सदर गावे बुडीत क्षेत्रात येऊ नये, यासाठी तेलंगणा सरकार गोदावरी तिरावर मातीचा भराव टाकणार आहे. यासाठी राज्य शासनाने १० हेक्टर वनजमीन वळती केली आहे.

ठळक मुद्देकालेश्वरम प्रकल्पाचा फटका : आईपेठा व तुमनूर गावे बुडण्याचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तेलंगणा सरकारच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या कालेश्वरम सिंचन प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील आईपेठा व तुमनूर ही गावे बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. सदर गावे बुडीत क्षेत्रात येऊ नये, यासाठी तेलंगणा सरकार गोदावरी तिरावर मातीचा भराव टाकणार आहे. यासाठी राज्य शासनाने १० हेक्टर वनजमीन वळती केली आहे.गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारच्या वतीने कालेश्वरम धरण बांधले जात आहे. या धरणाचे संपूर्ण पाणी तेलंगणासाठी वापरले जाणार आहे. सदर पाणी कालव्याने हैदराबादपर्यंत नेले जाणार आहे. सिरोंचा तालुक्यातील गावांना पाणी मिळणार नाही. मात्र काही गावे बुडणार आहेत. सुरूवातीला गावकऱ्यांनी विरोध केला. महाराष्टÑ राज्य शासनाकडे मागणी केली. मात्र राज्य शासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता सिरोंचा तालुक्यातील काही गावे बुडीत क्षेत्रात येणार आहेत.आईपेठा व तुमनूर ही गावे बुडीत क्षेत्रात जाऊ नये, यासाठी गोदावरी नदीच्या डाव्या सिमेंट काँक्रिट व मातीचा तिरावर भराव टाकला जाणार आहे. या ठिकाणी जंगल असल्याने सदर जमीन वनविभागाच्या अखत्यारित आहे. ज्या ठिकाणी भराव टाकायचा आहे, त्यासाठी १०.२३ हेक्टर वनजमीन वळती केली जाणार आहे.भराव टाकताना पर्यावरण संवर्धन कायद्याच्या सर्व अटी तेलंगणा सरकारने पाळाव्यात, असे निर्देश दिले आहेत. याबाबत राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाने ६ जुलै रोजी शासन निर्णय काढला आहे. भराव टाकण्यामुळे ही दोन्ही गावे बुडीत क्षेत्रात येणार नाही. मात्र सिंचनाचा लाभही मिळणार नाही.जमीन महाराष्ट्राची, पाणी मात्र तेलंगणालागोदावरी नदी महाराष्ट्र व तेलंगणा राज्याची दुभाजक आहे. त्यामुळे या नदीच्या पाण्यावर दोन्ही राज्यांचा सारखा हक्क आहे. तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर प्रकल्प उभा केला. या ठिकाणचे पाणी ३०० किमी अंतरावर असलेल्या हैदराबाद येथे पोहोचविले जाणार आहे. गोदावरी नदीच्या पाण्यावर दोन्ही राज्यांचा सारखा हक्क आहे. प्रकल्पासाठी सिरोंचा तालुक्यातील शेकडो हेक्टर जमीन बुडीत क्षेत्रात जात आहे. मात्र पाण्याचा लाभ तेलंगणा राज्याला होणार आहे. महाराष्ट्र शासनाने कोणतेही पाऊल उचलले नसल्याने राज्याला लाभ मिळाला नाही.