शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरीच्या पुलाला आर. आर. पाटील यांचे नाव द्या

By admin | Updated: September 23, 2016 01:43 IST

सिरोंचा तालुक्यात तेलंगणा-महाराष्ट्राला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांना निवेदन : अहेरीवरून हैद्राबाद बस सुरू कराअहेरी : सिरोंचा तालुक्यात तेलंगणा-महाराष्ट्राला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी कार्यकारी जिल्हाध्यक्ष बबलू हकीम यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने राज्य सरकारकडे केली आहे. तसेच अहेरी उपविभागातील व जिल्ह्यातील प्रमुख मार्गांची दुरवस्था झाली असून काही ठिकाणी कमी उंचीच्या पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गांची दुरूस्ती करून खड्डे बुजविण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. अहेरी-सिरोंचा-हैद्राबाद अशी बससेवा सुरू करण्यात यावी, असेही या निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदन उपविभागीय अधिकारी राममूर्ती यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पाठविण्यात आले आहे. एसडीओंना निवेदन देताना राजेश्वर उत्तरवार, कुसूम दुधी, अंजना पेंदाम, आदिल पठाण, आत्माराम गदेकर, पुष्पा अलोणे आदी उपस्थित होते. पाठपूरावा करण्याचे आश्वासन एसडीओंनी दिले.(प्रतिनिधी)या मार्गांची करा दुरूस्तीआलापल्ली-मुलचेरा, अहेरी-आष्टी, आलापल्ली-सिरोंचा, आलापल्ली-एटापल्ली, एटापल्ली-कसनसूर-जारावंडी, अहेरी शहर या प्रमुख मार्गांची दयनिय अवस्था झाली आहे. शेकडो लोक या मार्गावरून आवागमन करतात. मात्र रस्ता खराब झाल्याने नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावरील खड्ड्यामुळे अनेकांना पाठीचे आजार वाढले आहेत. याशिवाय एटापल्ली-बुर्गी-कांदोळी, मन्नेराजाराम-ताडगाव, मोयाबीनपेठा या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे, अहेरी-देवलमरी-व्यंकटापूर या रस्त्याचीही दुरूस्ती करण्यात यावी, अहेरी-आष्टी दरम्यान दिना नदीच्या पुलावर मोठा खड्डा पडला आहे. तसेच चौडमपल्ली येथील पुलावरही अशीच अवस्था आहे. हे खड्डे तत्काळ बुजविण्यात यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. अहेरी-बुर्गी-कांदोळी या मार्गावर बसफेरीही सुरू करण्यात यावी, असे निवेदन पाठविण्यात आले आहे.