शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी पुलावरून ट्रकद्वारे रेतीची वाहतूक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 00:58 IST

गेल्या काही दिवसांपासून सिरोंचा तालुक्यात रेती वाहतूक करणाºया ट्रकांचा बोलबाला असून येथील गोदावरी पुलावरून दिवसरात्र रेतीची ट्रकांद्वारे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे.

ठळक मुद्देट्रकांच्या रांगेने वाहतुकीस अडथळा : पुलास धोका होण्याची शक्यता; प्रशासकीय अधिकारी सुस्त

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : गेल्या काही दिवसांपासून सिरोंचा तालुक्यात रेती वाहतूक करणाºया ट्रकांचा बोलबाला असून येथील गोदावरी पुलावरून दिवसरात्र रेतीची ट्रकांद्वारे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. दरम्यान रेती भरलेल्या ट्रकांची गोदावरी नदीच्या पुलावर लांबच्या लांब रांग राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी या पुलास धोका होण्याची शक्यता बळावली आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचा कानाडोळा आहे.वर्षभरापूर्वी गोदावरी नदीच्या पुलाचे रितसर उद्घाटन झाले होते. सदर पूल निर्मितीमुळे दोन राज्याचा संपर्क थेट वाढणार असून महाराष्टÑ व तेलंगणा राज्यातील जनतेचे आवागमन सुलभरित्या होईल, लोकांचा प्रवास सुखकर होईल, असे वाटले होते. मात्र आता पूल निर्मितीनंतर सदर मार्ग रेती वाहतुकदारांसाठीच निर्माण करण्यात आला काय, असाही प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. रेती भरलेल्या ट्रकच्या अपघातात दोन ते तीन जणांना आपला प्राण गमवावा लागला. छोटमोटे अपघात सुरूच आहेत. सिरोंचा तालुक्यातील रेती घाटावरून तेलंगणा राज्यात रेती नेण्यासाठी ट्रकांचे आवागमन दिवसरात्र सुरू आहे. ट्रकांचे वजन करण्यासाठी रेतीघाटावर व्यवस्था आहे. महाराष्टÑाच्या हद्दीतील ट्रकांमध्ये किती रेती भरलेली आहे, याचे मोजमाप करण्याची कोणतीही यंत्रणा नाही. वनजकाटा सुद्धा आंध्रप्रदेशाच्या हद्दीत आहे. रेतीने भरलेले ट्रकाचा वजनकाटा गोदावरी नदीच्या पुलाच्या पलिकडे आहे. येथे मोजमाप केल्यानंतर ट्रक पुढे मार्गक्रमण करतात. रेतीघाटावर ट्रक चालकांना रेतीची टिपी दिली जाते. तेलंगणात या ट्रकाचे वजन केले जाते. जास्त रेती असल्यास उर्वरित रेती रस्त्याच्या कडेला उतरविली जाते. त्यामुळे गोदावरी नदीच्या पुलावर १०० ट्रकांची रांग पाहावयास मिळते. मात्र गोदावरी नदीचा पूल एवढ्या मोठ्या प्रमाणातील वजन पेलू शकतो की नाही, याबाबत स्पष्टता नाही. भविष्यात सदर पूल कोसळण्याची घटना घडल्यास या घटनेला जबाबदार कोण, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मात्र यासंदर्भात कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेला सोयरसुतक नाही. बांधकाम व महसूल विभाग हेतुपुरस्सर या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.रेतीची वाहतूक करणाºया ट्रकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो. त्यातल्या त्यात अपघाताची शक्यता अधिक असते. अशाप्रसंगी कायदा व सुव्यवस्था राखणारे पोलीस विभागही सुस्त असल्याचे दिसून येत आहे. एकंदरित सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तसेच जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. सिरोंचा तालुक्यात रेती वाहतुकीचे हे भयावह चित्र असतानाही अधिकाºयांचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. सदर प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाºयांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी सिरोंचा तालुकावासियांनी केली आहे.