शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय पुरस्काराने मुत्तापूरचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 22:23 IST

राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनेंतर्गत नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत जलसंधारणाची अनेक कामे करण्यात आली.

ठळक मुद्देजलसंधारण मंत्र्यांच्या हस्ते सन्मान : ४८ प्रस्तावित कामे पूर्ण करून नागपूर विभागात उत्तम कामगिरी

आॅनलाईन लोकमतअहेरी : राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनेंतर्गत नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत जलसंधारणाची अनेक कामे करण्यात आली. २०१५-१६ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानात अहेरी तालुक्यातील महागाव ग्राम पंचायत हद्दीतील मुत्तापूर गावाने प्रस्तावित ४८ कामे यशस्वीरित्या पूर्ण करून नागपूर विभागात अव्वल स्थान पटकाविले. त्याबद्दल जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व साडेसात लाख रूपयांचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला.मुत्तापूर येथे सर्व यंत्रणांनी एकूण ४८ कामे प्रस्तावित केली होती. या कामांमध्ये शेततळे, बोडी नूतनीकरण, बंधारा दुरूस्ती, सिमेंट नाला बांधकाम आदींचा समावेश होता. गावाने प्रस्तावित कामे पूर्ण केली. जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व साडेसात लाख रूपयांचा धनादेश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांना प्रदान करण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी चौधरी, सीईओ शांतनू गोयल, तालुका कृषी अधिकारी पानसरे, वाकडे, सरपंच हरी आत्राम, कृषी पर्यवेक्षक शंभरकर, कृषी सहायक लोनगाडगे हजर होते.तसेच जिल्हास्तरावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर द्वितीय पुरस्कार पटकाविल्याबद्दल सन्मानचिन्ह, तीन लाख रूपयांचा धनादेश तालुका कृषी अधिकारी पानसरे यांनी स्वीकारला. सदर अभियान उपविभागीय कृषी अधिकारी तांबे यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आले.क्षेत्र व उत्पादनात वाढजलसंधारणाची कामे मुत्तापूर येथे झाल्याने शेतकऱ्यांचा कल भाजीपाला पिकाकडे वाढला. रबी पिकाखालील क्षेत्र १५ टक्के वाढले तसेच २५ टक्क्याने उत्पादनात वाढ झाली. गावकºयांनी लोकसहभागातून वृक्ष लागवड, वनराई बंधाºयाचे बांधकाम करून जलसंधारणाचे काम केले.