शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

मदतीचा हात देत त्यांनी दिला माणुसकीचा परिचय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:46 IST

(बॉक्स) चंदनखेडीत गरजूंना धान्यवाटप चामोर्शी तालुक्यातील चंदनखेडी येथील सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर चरडे यांनी गरीब व गरजूंना धान्यवाटप केले. मागील ...

(बॉक्स)

चंदनखेडीत गरजूंना धान्यवाटप

चामोर्शी तालुक्यातील चंदनखेडी येथील सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर चरडे यांनी गरीब व गरजूंना धान्यवाटप केले. मागील वर्षापासून कोरोनाचा कहर आहे. यामुळे लोकांचा रोजगार हिरावला आहे. अशा स्थितीत गरिबांचे हाल हाेऊ नयेत यासाठी चरडे यांनी एक आठवडा पुरेल एवढ्या धान्याचे वाटप केले. ‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ या उदात्त हेतूने आमचे कार्य निरंतर सुरू राहील, असे युवा सामाजिक कार्यकर्ते दौलत आत्राम यांनी सांगितले. उपसरपंच भारत कनाके, ग्रामपंचायत सदस्य प्रियंका शेडमाके, बंडू शेडमाके, मोरेश्वर चरडे, गोपीनाथ चौधरी, अरुण शेडमाके, दौलत आत्राम, जोगाजी शेडमाके, अतुल डोके आदींनी त्यांच्या या उपक्रमाचे स्वागत केले.

संस्कारकडून वस्तूंचे वाटप

लॉकडाऊनमध्ये सर्व कामे ठप्प पडली. त्यामुळे मजुरीच्या भरवशावर उदरनिर्वाह करणाऱ्या वृद्ध नागरिकांपुढे मोठे संकट ओढवले. त्यांच्यासाठी एटापल्लीतील संस्कार संस्था धावून आली. या संस्थेच्या पुढाकाराने गरजू आणि वृद्ध कुटुंबांना गावातील काही सद‌्गृहस्थांच्या मदतीने तांदूळ व जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले जात आहे. ही सेवा पुढेही सुरूच राहील, असे संस्थेचे अध्यक्ष विजय संस्कार, गणेश ठावरे आणि पूजा संस्कार यांनी सांगितले.

कोविड वॉरिअर्स ग्रुपचा सेवाभाव

कोरोनाच्या संकटकाळात कोरची येथील कोविड केअर सेंटरमध्ये उद‌्भवणाऱ्या समस्या दूर करून रुग्णांना शक्य ती सर्व सुविधा देण्यासाठी कोरची कोविड वॉरिअर्स ग्रुप तयार करून काही सेवाभावी युवकांनी पुढाकार घेतला आहे. कोरचीतील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, कर्मचारी, पत्रकार, ग्रामसभेचे पदाधिकारी, राजकीय पदाधिकारी यांच्यासह गुप्तदान करणाऱ्या अनेक दानशूरांनी मदतीचा हात पुढे केला त्यातून रुग्णांना हव्या त्या सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे रुग्णांच्या अनेक समस्या दूर झाल्या आहेत.